करोना अपडेट
करोना अपडेट
नाशिक

जिल्ह्यात करोनाग्रस्तांचा आकडा १४४१६ वर

२४ तासात विक्रमी ६५७ नवे रुग्ण

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जिल्हा तसेच शहरात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात विक्रमी 657 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्ताचा आकडा 14 हजार 416 इतका झाला आहे. तर दुसरीकडे एकाच दिवसात जिल्ह्यातून 967 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज जिल्ह्यातील 3 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूचा आकडा पाचशेच्या उबंरठ्यावर आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 657 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 574 रूग्ण आहेत. यात शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सातपुर गाव, दसक, उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, हिरावाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळारोड येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 9 हजार 411 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 71 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 3 हजार 516 झाला आहे. यामध्ये सर्वाधिक सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, येवला, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावात आज 9 रूग्ण आढळले आहेत. यामुळे मालेगावचा आकडा 1 हजार 307 झाला आहेे. जिल्हा बाह्य 3 रू आढळल्याने आकडा 162 झाला आहे. तर करोनामुळे आज दिवसभरात 3 जणांचा मत्यू झाला. यामध्ये नाशिक शहरातील 2 तर ग्रामिण भागातील एकाचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 499 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 410 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 11 हजार 127 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा मात्र वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 967 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 405 तर ग्रामिण जिल्ह्यातील 101 आहेत. जिल्हा रूग्णालय 8, मालेगाव 30, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 21 व होम कोरोंटाईन 102 रूग्णांचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण करोना बाधित : १४४१६

नाशिक : ९४११

मालेगाव : १३०७

उर्वरित जिल्हा : ३५३६

जिल्हा बाह्य : १६२

एकूण मृत्यू : ४९९

करोनामुक्त : १११२७

Deshdoot
www.deshdoot.com