जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या घटली

चोवीस तासात 4 हजार 69 जण करोनामुक्त; आज 41 बळी
जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या घटली
करोना

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यात शहर तसेच ग्रामिण भागात मागील आठ दिवसांपासून सातत्याने करोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत घट येत आहे. मात्र गुरूवार तसेच शुक्रवार या दोन दिवसात काहीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा या संख्येत मोठी घट झाली आहे. मागील चोवीस तासात 4 हजार 69 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुक्त होणारांच्या संख्येने 3 लाख 16 हजार 19 चा आकडा पार केला आहे.

आज दिवसभरात 2 हजार 795 जणांचे अवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बरे होणार्‍या रूग्णांपेक्षा पॉझिटिव्हचा आकडा दीड हजाराने कमी आहे. तसेच उपचाराखालील रूग्णसंख्येतही मोठी घट होत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. दरम्यान मृत्युचे प्रमाण कायम असून आज 41 रूग्णांचा मृत्यू झाले. नाशिक शहरात करोना आटोक्यात येत असून ग्रामिण भागात मात्र करोनाचे रूग्ण संख्या अधिक आहेत. तसेच मृत्युचे प्रमाणही ग्रामिण भागात अधिक असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 2 हजार 795 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 1 हजार 429 रुग्ण आहेत. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या काहीसी वाढ असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 298 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. मालेगावात 17 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 11 हजार 818 झाला आहेे. जिल्हा बाह्य 51 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 4 हजार 964 झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोना रूग्णांचा आकडा 3 लाख 53 हजार 82 इतका झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये मात्र सातत्य कायम असून आज जिल्ह्यात 41 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 30 रूग्ण आहेत, नाशिक शहरातील 10, मालेगाव येथील 1 रूग्णांचा सामावेश आहे.यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 3 हजार 825 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटत चालला असून मागील चोवीस तासात 3 हजार 159 नवे संशयित दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक 2 हजार 864 नाशिक शहरातील आहेत. तर आज दिवसभरात 33 हजार 238 रूग्णांवर उपचार सुरू होते.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 3,53,082

* नाशिक : 2,07,776

* मालेगाव : 11,818

* उर्वरित जिल्हा : 1,28,524

* जिल्हा बाह्य ः 4,964

* एकूण मृत्यू: 3,825

* करोनामुक्त : 3,16,019

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com