नाशिक | प्रतिनिधी

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असून दररोज सरासरी साडेतीनशे ते चारशे नवे करोना पॉझिटिव्ह रूग्ण दाखल होत आहेत. शनिवारी हा आकडा अचानक ६४५ वर पोहचला आहे. परिणामी आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्हचा आकडा सव्वा लाखाच्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात पावणे चारशे रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

करोना रूग्णांची संख्या वाढल्याने प्रशासनाच्या चिंताही वाढल्या आहेत. मार्च २०२० पासून जिल्ह्यातील आतापर्यंत करोना पॉझिटिव्हचा आकडा १ लाख २५ हजार ३३२ इतका झाला आहे.

नागारीकांचे मास्क, सॅनिटायझर वापर, करोना नियम पाळण्याबाबत झालेले दुर्लक्ष, बदलते वातावरण यामुळे पुन्हा करोनाने जिल्ह्यात वर डोके काढल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील चोवीस तासात ३६४ रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा १ लाख १९ हजार ४९० वर पोहचला आहे. यामुळे जिल्ह्यात एकुण करोना मुक्तीचे प्रमाण घसरून ९५.३४ टक्केंवर पोहचले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील २४ तासात ६४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक ४०६ रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा ८२ हजार २२९ वर पोहचला आहे. आज ग्रामिण भागातील १६३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा ३६ हजार ४३९ झाला आहे. मालेगावात ५२ रूग्ण आढळल्याने येथील आकडा ५ हजार २८१ झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा १ हजार ३७३ झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज वाढ झाली जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू होत आहे. यात नाशिक शहरातील २ दोन तर ग्रामिण भागातील ४ आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा २ हजार १३३ इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात १ हजार १११ नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक १ हजार ७१ रूग्ण नाशिक शहरातील आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : १,२५,३३२

* नाशिक : ८२,२३९

* मालेगाव : ५,२८१

* उर्वरित जिल्हा : ३६,४३९

* जिल्हा बाह्य ः १३७३

* एकूण मृत्यू: २१३३

* करोनामुक्त : १,१९,४९०