काळजी घ्या! नाशकात करोनाची रुग्णसंख्या दोनशेपार

काळजी घ्या! नाशकात करोनाची रुग्णसंख्या दोनशेपार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात 216 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर 74 रूग्णांनी करोनावर मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात 216 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरात (Nashik City) 151, नाशिक ग्रामीण (Nashik Rural) विभागात 36, मालेगाव (Malegaon) 00 तर जिल्हाबाह्य 29 रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात आज दोन करोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हे दोन्ही रुग्ण नाशिक मनपा परिक्षेत्रातील होते. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 8 हजार 758 इतकी आहे.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील तीन दिवस जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या शंभरीपार गेली होती. मागील चोवीस तासात 216 नवे करोनाबाधित आढळल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा, करोना बाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com