नांदगावला करोनाबाधितांची संख्या चिंताजनक

नांदगावला करोनाबाधितांची संख्या चिंताजनक
करोना

नांदगाव । प्रतिनिधी

नांदगाव शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्याच बरोबरीने मृत्यू चे प्रमाण देखील वाढत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

नांदगाव शहरात आणि ग्रामीण भागात दिवसागणिक बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून कोरोनाचा विळखा अधिक घट्टपणे आवळला जात आहे असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. शासकीय स्तरावरून कोणाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्यातरी देखील बेजबाबदार नागरिक आणि व्यवसायिक यांच्यामुळे करुणा चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. कडक लॉकडाऊन लावण्यात आला असताना देखील गेल्या काही दिवसांपासून नांदगाव शहरात बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसून येत आहे. कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून नगरपालिका प्रशासनाने व्यापार्‍यांची गेल्या काही दिवसापासून अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे.

नांदगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 785 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधीतांची भर पडत आहे. नांदगाव येथील कोव्हीड सेंटर सुरूवाती पासुनच पुर्ण क्षमतेने भरलेले आहे. नांदगाव शहरातील काही भाग हे कोणाचे हॉटस्पॉट बनू पहात आहेत तसेच मृत्यूचे तांडव देखील कमी होताना दिसत नसल्याने प्रशासनापुढे मोठी समस्या उभी ठाकली आहे. शहरातील बेजबाबदार व्यवसायिकांनी नागरिक हे देखील कोरना वाढीला कारणीभूत ठरत आहे. छोटे-मोठे व्यवसायिक हे कडक लॉकडाऊन असताना देखील दुकानाचे अर्धे शटर उघडून व्यवसाय करत असतात तसेच भाजी मंडईत देखील हाच प्रकार दिसून येत आहे.

शहरात देखील कोरोना बाधित गृह विलगीकरण आत असलेले रुग्ण बिनदिक्कतपणे बाहेर फिरत आहेत यामुळे देखील कोरना वाढीला अशा व्यक्ती हातभार लावत आहेत. प्रशासनाच्यावतीने देखील कोरोनाचा अटकाव करण्यासाठी कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने बिनदिक्कतपणे खुली ठेवण्यात येत आहे. अशा दुकानाकडे चेहरे बघून कारवाई केली जात आहे. अशी काही व्यवसायिकांची तक्रार आहेत. प्रशासनातील अधिकारीच अशा पद्धतीने वागत असतील तर करोनाचाचा अटकाव कोणाच्या भरवशावर केला जाईल असा मोठा प्रश्न उपस्थित राहतो.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com