जिल्हा परिषद
जिल्हा परिषद
नाशिक

बदल्यांच्या नवीन निर्णयामुळे शिक्षकांमध्ये ‘कही खूशी,कही गम ’

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी (दि.5) घेतला.दरम्यान, जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या रद्द झालेल्या असल्या तरी सामाजिक अंतर ठेवून विनंती बदल्यांना मात्र शासनाने परवानगी दिली आहे. तयामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये ‘कही खूशी , कही गम ’ असे चित्र आहे.

नाशिक जिल्ह्यात एकूण तीन हजार 279 शाळांमध्ये सुमारे दोन लाख 76 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. राज्यात सध्या करोनामुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांनी आपल्या स्तरावर ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवले आहे. जिल्ह्यात सुमारे साडेबारा हजार शिक्षक आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदल्यांना यंदा मान्यता द्यायची की नाही ? याविषयी प्रशासनाने राज्य सरकारचे मार्गदर्शन मागवले होते.

सरकारने याविषयी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिले असून फक्त विनंती बदल्या घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वी 15 जुलै 2020 रोजी प्राप्त शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही करताना समुपदेशाच्या वेळी इच्छुक शिक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता निदर्शनास आली होती. त्याअनुषंगाने राज्य सरकारने बदल्यांचे फेरआदेश पाठवले आहेत.

सद्यस्थितीत कोविड-19 चा प्रादुर्भाव विचारात घेता सामाजिक अंतर ठेवण्याच्या दृष्टीने तसेच शिक्षकांच्या अपरिहार्य प्रशासकीय बदल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी शिक्षकांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने कोणाचीही तक्रार येणार नाही. यादृष्टीने योग्य ती काळजी घेवून प्राथमिक शिक्षकांच्या फक्त जिल्हांतर्गत विनंती बदल्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याही समुपदेशानाद्वारे करण्याचे आदेश दिले आहेत.

याव्यतिरीक्त शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येऊ नयेत, तसेच जिल्हांतर्गत विनंती बदल्यांची कार्यवाही करताना शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणासंदर्भातील शासनाचे आदेश कटाक्षाने पाळण्यात येतील, याचीही खरबदारी घेण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीने करावयाच्या आंतरजिल्हा बदल्यांसदर्भात योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाचे कक्ष अधिकारी भांडारकर यांनी दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com