अत्याधुनिक सुविधांयुक्त उड्डाणपूल उभारण्याची गरज

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची मागणी
अत्याधुनिक सुविधांयुक्त उड्डाणपूल उभारण्याची गरज

नवीन नाशिक | प्रतिनिधी Navin Nashik

त्रिमूर्ती चौक (Trimurti Chowk) ते सिटी सेंटर मॉल (City Center Mall) या ठिकाणी साकारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलाचे (Flyover) भूगर्भ माती परिक्षणाचे काम पूर्ण झाले असून आता उड्डाण पुलाचे काम कधी सुरू होणार याबाबत नागरिकांना आतुरता लागली आहे.

तसेच उड्डाणपुलाखालील रस्ता सुटसुटीत तसेच मोकळा असावा वाहतुकीची कोंडी (Traffic jam) होऊ नये, यासाठी जुन्या तंत्रज्ञानाचा (Old technology) वापर न करता नवीन अत्याधुनिक सुविधांयुक्त उड्डाणपूलाचे (New state-of-the-art flyover) काम लवकरात लवकर सुरू करून नवीन नाशिककरांना (Navin Nashik) दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

नवीन नाशिक (Navin Nashik) व सभोवतालच्या परिसरात वाढती लोकसंख्येचा तसेच नियमित होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता शिवसेना (Shiv Sena) महानगरप्रमुख तथा नगरसेवक सुधाकर बडगुजर (Mayor and Corporator Sudhakar Badgujar) यांनी उड्डाणपूल व्हावा यासाठी आग्रही मागणी केली होती

उड्डाण पुलाच्या कामासाठी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. यानुसार जानेवारी २०२१ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाचे टेंडर (Tender of work) निघाले. यानंतर पुलाचे काम सुरू करण्यासाठी ठेकेदाराला वर्कऑर्डर देखील देण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पुलाचे काम सुरू होणार होते. उड्डाणपुलाचा श्रेयवाद तसेच शिवसेना व भाजप (BJP) यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुलाचे काम रखडले.

गेल्या काही दिवसांपूर्वीच आता उड्डाणपुलाच्या भूगर्भ माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याने आता उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरू करणार याची आतुरता नागरिकांना लागली आहे. तसेच त्रिमूर्ती चौक ते सिटी सेंटर मॉल येथे साकारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाखाली जास्तीत मोकळी जागा मिळावी तसेच वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी नव्याने आलेल्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त तंत्रज्ञानाचा वापर करून उड्डाणपूल उभारावा अशी मागणी व्यक्त केली आहे.

गर्डर टेक्नॉलॉजी न वापरता प्री-कास्ट सिग्मेंटल ही टेक्नॉलॉजी वापरावी

उड्डाणपुलाच्या कामासाठी सध्यस्थितीत गर्डर (Girder) ही टेक्नॉलॉजी जुनी असल्याने त्यामध्ये पुलाच्या सपोर्टसाठी जास्तीत जास्त कॉलम उभारावे लागतात. त्यामुळे पुलाच्या खालची अधिक जागा व्यापली जाते. तसेच जागेची रुंदी कमी असल्यामुळे सिंगल कॉलम उभारून त्यात प्री कास्ट सिगमेंटल (Pre-cast segmental) या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणे गरजेचे आहे.

तसेच लोकवस्तीतून उड्डाणपूल उभारत असल्याने त्याचे ध्वनिप्रदूषण (Noise pollution) होऊ नये म्हणून मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक ध्वनिरोधक यंत्रणा (Soundproofing system) बसवणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल तसेच ध्वनी प्रदूषण देखील होणार नाही. खर्च व वेळ ही कमी लागेल. लिकिजेस होणार नाहीं.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com