वैश्विक आरोग्यासाठी 'योग' गरजेचा

वैश्विक आरोग्यासाठी 'योग' गरजेचा
Yoga

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून मविप्र संचालित समाजकार्य महाविद्यालयात संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेल्या 'yoga for Wellbeing' या विषयावर मुंबई येथील योगप्रबोधिनीच्या योग प्रशिक्षक कविता निकम यांच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले...

कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. विलास देशमुख यांनी आपल्या पारंपारिक योग शैलीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

कविता निकम यांनी सांगितले की, योग असे एक औषध आहे ज्यात विश्वाच्या कोणत्याही आजारावर उपचार करण्याचे सामर्थ्य आहे. दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे ही आरोग्यासाठी चांगली प्रथा आहे. दैनंदिन आयुष्यासाठी योगा केल्याने आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो.

तसेच निकम यांनी कोरोना काळात मानवाची ऑक्सिजन पातळी स्थिर राहण्यासाठी विविध प्रकारचे प्राणायम व श्वासासंबंधी असणारे प्रात्यक्षिक करून दाखविले.

कार्यक्रमासाठी चंद्रप्रभा निकम, मनीषा शुक्ला, सुनिता जगताप, सोनल बैरागी, प्रतिभा पगार, प्रतिमा पवार यांचे सहकार्य लाभले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com