
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
दिव्यांग (handicapped) व्यक्तींना मुख्य प्रवाहात (mainstream) आणण्यासाठी आपल्या सर्वांची सामुहिक आणि सामाजिक जबाबदारी (Collective and social responsibility) आहे.
त्यासाठी त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी शासकीय पातळीबरोबरच सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा त्यातूनच या मुलांचे जीवन सुखकर होईल अनुकूल होईल. त्यासाठी दिव्यांगासाठीच्या योजना, उपक्रम त्यांच्यापर्यंत नेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महात्मा गांधी सेवा संघाचे अध्यक्ष (President of Mahatma Gandhi Seva Sangha) तथा नाशिक जिल्हा दिव्यांग पुर्नवसन संचालक (Nashik District Handicapped Rehabilitation Director) विश्वास जयदेव ठाकूर (Vishwas Jaydev Thakur) यांनी केले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय (Ministry of Social Justice and Empowerment), भारत सरकार (indian government), नवी दिल्ली (new delhi), यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई (Yashwantrao Chavan Pratishthan Mumbai), अपंग हक्क विकास मंच (Disability Rights Development Forum), समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिक (Social Welfare Department Zilha Parishad Nashik), महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक (District Disability Rehabilitation Center Nashik run by Mahatma Gandhi Seva Sangh), सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ (Sahyadri Shikshan Prasarak Mandal) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना एडीपी योजने (ADP plan) अंतर्गत कुत्रिम अवयव साहित्य व साधनांचे (Prosthetics and tools) मोफत वाटप शिबिर जागृती कर्ण बधीर निवासी विद्यालय, मखमलाबाद (makhmalabad) येथे करण्यात आले. होते. याप्रसंगी श्री ठाकूर बोलत होते. सदर साधनांचे वाटप श्री. विश्वास ठाकूर यांचे शुभहस्ते करण्यात आले.
श्री. विश्वास ठाकूर म्हणाले की, दिव्यांगाना शिकवणारे शिक्षक (education) खरे देवदूत आहेत ते विद्यार्थ्यांची (students) जपवणूक, जोपासना व संगोपन करत असतात. समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नाशिकचे वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता श्री. विजय पाटील म्हणाले की, दिव्यांगाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वातोपरी प्रयत्न करत असते. त्यांना आपलेपणाच्या जाणीवेतून आपल मानणे, सहकार्य करणे आपली जबाबदारी आहे. सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र सुर्यवंशी म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीत शाळेने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व सामाजिक जाणिवेतून काम सुरू ठेवले आहे, त्याला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र (Global Identity Card), श्रवण यंत्राचे (Hearing aids) वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे सह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश लुंकड, सचिव कमलेश कोठारी, अखिल भारतीय पुनर्वसन संस्था नाशिकच्या अध्यक्षा सुहासिनी घोडके, बाळासाहेब गिरी, एम.एम. पाटील, समन्वयक कृष्ण शिरसाठ, योगेश पाटील, यतिन अहिरे, विकास मंदिर मुक बधीर विद्यालय, नाशिक रोड मुख्यध्यापिका वनिता दास आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र वाघमोडे यांनी केले.