सर्वस्पर्शी सहकाराची आवश्यकता

सहकार भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर
सर्वस्पर्शी सहकाराची आवश्यकता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दैनंदिन जीवनात लागणाऱ्या प्रत्येक क्षेत्रात चांगली सहकारी संस्था उभारण्यासाठी co-operative societies सहकार भारतीच्या Sahkar Bharti कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक सुलभता यावी असे आवाहन सहकार भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री संजय पाचपोर Sahakar Bharati's National Organization Minister Sanjay Pachpore यांनी नाशिक येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.

नाशिक शहर - जिल्हा सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांना पाचपोर यांनी शंकराचार्य न्यास येथे संबोधित केले. यावेळी प्रांताध्यक्ष डॉ. शशीताई अहिरे, महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश संघटन मंत्री संजय परमाणे, नाशिक शहराध्यक्ष ऍड परमानंद गुजराती, सह संघटन मंत्री शरद जाधव उपस्थित होते.

शहर - जिल्ह्यातील नागरिकांची गरज ओळखून सहकारी संस्थांची निर्मिती व्हायला हवी, त्यामध्ये विद्यार्थी ग्राहकांची सहकारी संस्था, वाहतूकदारांची संस्था, आरोग्य क्षेत्रातील सहकारी संस्था, विमा क्षेत्रातील सहकारी संस्था, भाजीपाला पुरवठादार यांची संस्था, टॅक्सी चालकांची संस्था इत्यादी विविध प्रकारात सर्वस्पर्शी सहकारिता निर्माण होण्यासाठी सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत असे पाचपोर म्हणाले.

सहकार क्षेत्र आज बदनाम आहे, त्यातील बदनामीची चर्चा अधिक होते. मात्र अमुल, इफको, कृभको, लिज्जत पापड या सारख्या सहकारी संस्थांच्या यशोगाथा समाजासमोर येत नाहीत याची खंतही पाचपोर यांनी व्यक्त केली.

जशी दुधाच्या क्षेत्रात 'अमूल' निर्माण झाली तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रात एक एक आदर्श सहकारी संस्था निर्माण झाली तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचेआणि सहकार मंत्री अमित शहा यांचे पाच मिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न साकार होईल आणि देश खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होईल असे ते म्हणाले.

यासाठी सहकार भारती च्या कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यातील यशस्वी सहकारी संस्थांच्या डाटा गोळा करून त्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्याचे आवाहन पाचपोर यांनी केले. सहकार क्षेत्रातून आर्थिक समृद्धी करणे, बेरोजगारी कमी करणे शक्य आहे .आज आपल्या विरोधी विचार धारेचे लोक सुद्धा आपल्याकडे सहकारी क्षेत्राला आपणच पुनर्वैभव प्राप्त करून देऊ शकतो या आशेने पाहत असल्याचे ते म्हणाले.

सहकार भारती च्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील सहकारी संस्था उभारून त्या यशस्वीपणे चालवण्याचे मॉडेल तयार केले पाहिजे, कोणतीही सहकारी संस्था प्रामाणिकपणे चालवली तर ती बुडूच शकत नाही असेही ते म्हणाले.

मी वीस वर्षे या संस्थेचा संचालक व अध्यक्ष आहे हा आपला परिचय असता कामा नये. मी या संस्थेच्या अध्यक्ष किंवा संचालक झाल्यानंतर किती सभासदांची आर्थिक उन्नती साधली, किती रोजगार निर्माण केले, संस्थेला नावारूपाला कसे आणले हा आपला परिचय असावा यासाठी सहकार भारती च्या कार्यकर्त्यांनी चिंतन करून या चळवळीला नवनवीन आयाम प्राप्त करून द्यावेत अशी अपेक्षाही संजय पाचपोर यांनी व्यक्त केली.

Related Stories

No stories found.