जैव इंधननिर्मिती प्रकल्पाची गरज

एमसीएल कंपनीच्या व्यवस्थापिका प्रमिला थविल यांचे प्रतिपादन
जैव इंधननिर्मिती प्रकल्पाची गरज

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

‘जैव इंधन निर्मिती प्रकल्प (Biofuel production projects) व सेन्द्रिय शेतीच्या (Organic farming) माध्यमातुन शेतकर्‍यांच्या (Farmers) जीवनात खर्‍या अर्थाने आर्थिक क्रांती (Economic revolution) घडावी, भारतदेश इंधनात स्वयंमपूर्ण व्हावा, ग्लोबल वार्मिंग (Global warming) सारख्या जागतिक समस्यांना (Global problems) रोखण्यासाठी जैव इंधन निर्मिती प्रकल्पाची गरज असून हा प्रकल्प शेतकर्‍यांसाठी वरदान ठरणार आहे’, असे प्रतिपादन एमसीएल कंपनीच्या (MCL Company) व्यवस्थापिका प्रमिला थविल यांनी केले.

आदिवासी दुर्गम भागाचा विकास करण्याकरीता जैव इंधन प्रकल्प सुरगाणा तालुक्यात (Surgana Taluka) सुरु केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी प्रमिला थविल बोलत होत्या. भारत देश 2030 पर्यंत इंधनात आत्मनिर्भर व्हावा हे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम (Former President Dr. APJ Abdul Kalam) यांचे स्वप्न साकार करण्यासाठी एमसीएल इंडियाचे (MCL India) संस्थापक डॉ. श्याम घोलप (Dr. Shyam Gholap) यांच्या मार्गदर्शनाखाली भारतामध्ये एकूण 5500 प्रकल्प राबवले जात आहे.

सुरगाणा तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी जैव इंधन प्रकल्प माहिती व सेन्द्रिय शेती मार्गदर्शन व सभासद नोंदणी (Guidance and member registration) सुरु करण्यात आली आहे. सभासद शेतकर्‍यांना मोफत बियाणे देणार असून त्यांच्याकडून कच्चा माल म्हणजेच हत्तिगवत, शेण, कचरा आदी हमीभावने विकत घेणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी लागणारी बियाणे, खते हमीभावाने देऊन पिकवलेल्या सेंद्रिय अन्न्धान्य, भाजीपाला, दुध उत्पादनाचे खरेदी विक्री व्यवस्थापन करणार आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये छोटे कारखाने अडीच एकरामध्ये उभे करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी तालुक्यातील दोन ते अडीच हजार युवकांना रोजगार निर्मिती (Job creation) होणार आहे. गावातील महिलांसाठी विशेष युनिट स्थापन करून त्यांना सक्षम बनवणार आहे. कंपनीचे सभासदत्व् घेतलेल्या प्रत्येकास रोजगार व शाश्वत उत्पन्नाची हमी कंपनी देत आहे.

यामुळे सुरगाणा तालुका इंधनात आत्मनिर्भर होणार असून तालुक्यात रोजगार निर्मिती ग्रामस्वछता, आरोग्य व पर्यावरणाचे रक्षण (Protection of health and environment) होणार आहे. यामुळे तालुक्यातील सर्वांनी या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येनें सहभागी होण्याचे आवाहन एमसीएलचे व्यवस्थापक प्रमिला थविल यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.