राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे चूल पेटवत आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे चूल पेटवत आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला आघाडीकडून (NCP City Mahila Aghadi) अध्यक्ष योगिता आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) चूल पेटवत अनोखे आंदोलन (agitation) करण्यात आले.

’होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी’ अशी घोषणाबाजी सरकारविरोधात केली. केंद्र सरकारने (Central Govt) घरगुती गॅस (Domestic gas) तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial gas cylinder) दरात वाढ (price hike) केल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.

माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Former Guardian Minister Chhagan Bhujbal) आणि पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या निर्देशाने शहर महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढीचा (Gas price hike) निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या फुटपाथवर महिला पदाधिकार्‍यांकडून चूल मांडून चहा देखील बनविण्यात आला. दरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गॅस दरवाढीचे फलक दाखवून निषेध नोंदवला.

या आंदोलनात माजी नगरसेविका सुषमा पगारे, राणू पाटील, सुरेखा निमसे, कुंद सहाणे, रोहिणी महाजन, संजीवनी शेवाळे, रुपाली तायडे, संगीता माळी, रुपाली पठारे, डॉ. प्रमिला पवार, विद्या बर्वे, निर्मला सावंत, दीप्ती हिरे, संगीता पाटील, संगीता सानप, सविता भामरे, मनीषा सोनवणे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com