शहरात लागणार सीसीटीव्ही, कॉलबॉक्स

शहरात लागणार सीसीटीव्ही, कॉलबॉक्स

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत Smart City Project सीसीटीव्ही कॅमेरे CCTV Cameras , व्हिडिओ मेसेजिंग डिस्प्ले (व्ही.एम.डी) Video messaging display , पब्लिक अनाऊन्समेंट सिस्टिम (पी. ए. सिस्टीम) Public announcement system , इमर्जन्सी कॉल बॉक्स (ईसीबी) Emergency call box बसवण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटी कंपनीने पोलीस आयुक्तालयाला पाठवला होता. पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील देत काही सूचना दिल्या आहेत.

स्मार्ट सिटीने शहरात 242 ठिकाणी 526 सीसीटीव्ही कॅमेरे, 4 व्ही.एम.डी, 8 पी.ए. सिस्टिम व 9 ईसीबी यंत्रणा बसवण्याबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. त्यानुसार या यंत्रणा बसवण्याचे कामकाज लवकरच सुरू होणार आहे.

शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच काळाची गरज ओळखून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी यंत्रणांनी वेळोवेळी सर्वेक्षण करून सीसीटीव्ही बसवण्याच्या जागा प्रस्तावित केल्या होत्या. सीसीटीव्ही आणि स्मार्ट इलेमेंटबाबत शहरातील 13 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वेक्षण करून प्रशासनाने 242 ठिकाणी 526 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

याआधी सुमारे 850 सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यानंतर 526 सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय झाला आहे. या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे शहरास कायमस्वरुपी सुरक्षा यंत्रणा मिळणार असून गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या व अत्यावश्यक यंत्रणा उपलब्ध होणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com