२४ तास सुरु राहणार बाजार समिती

२४ तास सुरु राहणार बाजार समिती

पंचवटी । वार्ताहर Nashik / Pan

नवनिर्वाचित सभापती देविदास पिंगळे यांनी बाजारसमिती संचालकासोबत दिंडोरीरोड, पेठरोडवरील बाजारसमितीची पाहणी केली.

शेतकर्‍यांच्या गरजा ओळखून जिल्हा भरातून येणार्‍या शेती मालाच्या विक्रीसाठी २४ तास भाजी मार्केट सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे सभापती देवीदास पिंगळे यांनी सांगितले

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे हमाल, मापारी, व्यापारी तसेच शेतकरी यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. बाजारसमिती सभापती म्हणून काम करतांना बाजारसमितीच्या सर्व घटकांना बरोबर व विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.

बाजारसमितीची पाहणी करतांना त्यांनी रस्त्याची झालेली दुरवस्था, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, बंद पथदीप आदि समस्या जाणून घेतल्या व व्यापारी, हमाल, शेतकरी यांच्यासह बाजारसमिती घटकांशी चर्चा करून बाजारसमिती प्रशासनाला तत्काळ समस्या मार्गी लावण्याबाबत सुचना केल्या व तक्रारी असल्यास तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन केले.

या पाहणी दौर्‍यात उपसभापती युवराज कोठुळे, संजय तुंगार,संपत सकाळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे, विनायक माळेकर, संदीप पाटील, माजी संचालक अनिल बुब आदि सहभागी झाले होते.

बाजारसमितीचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासासाठी सर्वांना बरोबर व विश्वासात घेऊन काम केले जाईल. सर्व व्यापारी, शेतकरी, व बाजारसमितीच्या घटकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टॉमेटोला सर्वाधिक भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदात असून जास्तीत जास्त टमाटा उत्पादक शेतकर्‍यांनी आपला शेतमाल समितीत आणावा.

देविदास पिंगळे, सभापती

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com