
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक मनपाने (Nashik Municipality) उत्पन्न वाढीसाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असून, घरपट्टी, पाणीपट्टी व नगर विकासाच्या (Urban development) उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
मनपाच्या आर्थिक (Financial) जमेच्या भागात घरपट्टी, पाणीपट्टी, विविध कर व नगर विकास विभागाचा मोलाचा वाटा राहतो. त्यात यंदाच्या वसूलीत मोठ्या प्रमात तफावत दिसून आल्याने मनपा आयुक्तांनी (Municipal commissioner) विशेष मोहीम हाती घेत सर्वच विभागांना गतिमान केले होते.
त्यात घरपट्टी विभागाने विशेष मोहीम हाती घेत शहरात वसुलीसाठी प्रयत्न सूरू केले. प्रत्यक्षात चालू आर्थिक वर्षात मागील थकबाकीसह 185 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यानुसार 21 फेब्रुवारी पर्यंत 152 कोटी रुपये उद्दिष्ट पूर्ती झाली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत ही 20 कोटी रुपयांनी जास्त आहे. यासाठी मनपाने ‘ढोल बजाव’ मोहीम (Drum playing campaign) हाती घेतली होती. थकबाकी दारांच्या घरासमोर ढोल वाजून त्यांना पैसे भरण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. या मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.