निफाडला आता मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्क

ड्रायपोर्ट प्रकल्पाला खो; अपयशाचे खापर मविआवर
निफाडला आता मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्क

नाशिक । प्रतिनिधी Nashik

निफाड ( Niphad ) येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाऐवजी तेथेे मल्टी मॉडेल लॉजेस्टीक पार्क (Instead of a dryport project, there is a multi-modal logistics park in Niphad)होणार असून गेली दोन वर्ष महाविकास आघाडीने जागा देण्यात घोळ घातल्याने शेेवटी हा मार्ग निवडण्यात आला आहे. त्यांच्या अपयशाचे खापर दुसर्‍यावर फोडण्यासाठी ते संभ्रम निर्माण करीत आहेत, असे केंंद्रीय आरोेग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar)यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.डॉ.पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर संंबंंधीत अधिक़ार्‍यांंच्या बैठका घेतल्या. त्यानंतर त्या पत्रकांरांंशी बोेलत होत्या.

त्या म्हणाल्या, निफाड येथे ड्रायपोर्ट प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटीने सहमती दर्शविल्याने निफाड येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचा निर्णय झाला होता. मात्र मध्ये दोन वर्ष महाविकास आघाडी सरकारने यात लक्ष दिले नाही. जागाही मिळू दिली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती आली नाही. आता तेथे मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कचा निर्णय झाला आहे.

2332 कोटीचा निधी

नाशिक जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी व हरघर शुध्द जलचे स्वप्न साकार करण्यासाठी 2332 कोटी रुपयांंचा निधी मंंजूर झाला आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या उड्या पडत आहे. त्यावर डॉ.पवार म्हणाल्या की, जिल्हा परीषदेच्या माध्यमातून 1230 कामे होणार असून त्यासाठी 1230 कोटीचा निधी मंंजूर झाला आहे. 37 कामे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून होेणार असून एकूण 2332 कोटी रुपये मिळणार आहे. त्यातील 864 कामे प्रगतीपथावर आहेत. 80 कामे पूर्ण झाली आहेत. 670 कामे सुरु आहेत.103 ठेेकेदार अनुभवी आहेत. मात्र त्याबाबत काही त्रुटी असतील तर त्याची चैाकशी केली जाईल. कामे दर्जेदारच झाली पाहीजे.आलेल्या निधीचा पुरेपूर उपयोग व्हावा व प्रत्येकाला शुध्द पाणी मिळावे, असा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी संंबंधीतांंना सुचना देण्यात आल्या आहेत.

50 टक्के कांंदा नाफेडकडेच पडून

आजच्या बैठकीत त्यांंनी रस्ते अपघात व नाफेडकडील कांंदा खरेदी व त्याचे वितरणातील त्रुटी याचा आढावा घेतला. 50 टक्के कांंदा अजून नाफेडकडेच पडून असल्याने त्याचे तातडीने वितरण करावे जेणेकरुन नवा कांंंदा खरेदी करुन भरता येईल,असे डॉ.पवार यांनी सांंगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com