आता कांदा विक्रीचे पैसे बाजार समितीतच मिळणार

आता कांदा विक्रीचे पैसे बाजार समितीतच मिळणार
File photo

देवळा । प्रतिनिधी Deola

देवळा (deola) कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) कांदा विक्री (Onion sales) करणार्‍या शेतकर्‍यांना (farmer) कांदा विक्रीचे पेमेंट आता बाजार समितीच्या कार्यालयातच मिळणार आहे. पूर्वी व्यापारी खळ्यावर कांदा विक्रीचे हिशेब मिळत होते.

त्यामुळे शेतकरीवर्गाने समाधान व्यक्त केले आहे. निर्णयाची अंमलबजावणी (Execution of decision) सुरू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती केदा आहेर (Keda Aher is the chairman of the market committee) यांनी दिली. बाजार समितीचे सभापती केदा आहेर, उपसभापती संजय चंदन, व्यापारी संचालक संजय शिंदे, रमेश मेतकर, सचिव माणिक निकम तसेच कांदा खरेदीदार व्यापारी यांच्या संयुक्तिक बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

देवळा बाजार समितीत शेतमाल विक्रीचे पेमेंट (Payment for sale of farm produce) शेतकर्‍यांना रोख स्वरुपात दिले जाते. मात्र काही शेतकरी (farmer) व व्यापारी संगनमताने काही पेमेंट रोख व उर्वरित पेमेंट उधार स्वरुपात करत असल्याचे बाजार समितीच्या निदर्शनास येत होते. सुरुवातीला व्यापारी व शेतकरी यांच्या संगनमताने झालेला हा व्यवहार नंतर तक्रार स्वरुपात पुढे येत असल्याने आता या गोष्टींना आळा बसणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com