
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मनपा, स्मार्ट स्कूल प्रकल्प (Smart School Project) सल्लागार पॅलेडियम कन्सल्टिंग कंपनी (Palladium Consulting Company), रोटरी क्लब (Rotary Club), आणि सक्सेस ग्लोबल फाउंडेशन (Success Global Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाच्या नऊ शाळांमध्ये (shcool) मियावाकी फॉरेेस्ट (Miyawaki Forest) (वन) प्रकल्प राबविण्यात येत आहे.
आतापर्यंत महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. एका शाळेत 242 अशा सहा शाळा (school) मिळून एकूण 1452 झाडांची लागवड (tree plantation) करण्यात आली आहे. संत गाडगेबाबा (Saint Gadge Baba) यांच्या जयंतीच्या दिवशी मनपा शाळा क्र. 43 येथे प्रकल्प हस्तांतरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापिका छाया माळी यांनी प्रस्तावना केली.
शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर (Education Department Administration Officer Sunita Dhangar) यांनी मियावाकी फॉरेस्ट प्रकल्प (Miyawaki Forest Project) तसेच स्मार्ट स्कूल प्रकल्प (Smart School Project) याविषयी माहिती दिली. रोटरी क्लब सदस्यांच्या उपस्थित मान्यवरांकडून मियावाकी फॉरेस्ट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रकल्पासाठी ठिंबक सिंचन प्रणाली (drip irrigation system) देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. मियावाकी फॉरेस्ट प्रकल्पांतर्गत शाळेत सीता अशोक, जरूळ, बकुळ, नीम, मोहगिनी, करंज आदी विविध प्रकारच्या 242 झाडांची लागवड करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला रोटरीचे माजी प्रांतपाल दादा देशमुख, माजी माजी प्रांतपाल रमेश मेहेर, जिल्हा सचिव रणजित साळवे, एन्क्लेव्ह क्लबचे अध्यक्ष सलिम बटाडा, सहाय्यक प्रांतपाल सीमा पाचाडे, राहुल महाजन, सक्सेस ग्लोबल फाऊंडेशनचे हर्षद वाघ, अमित टेंभुर्णे पॅलेडियम इंडिया प्रा. लि.चे प्रकल्प सल्लागार, स्मार्ट स्कूलचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ शिक्षक प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षक अंकुश तळपे यांनी आभार मानले.
मियावाकी जंगल निर्मितीची नवी पद्धत
जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगल निर्मितीची नवी पद्धत विकसित केली आहे. ही मानवनिर्मित जंगल पद्धती असून यामध्ये परिसंस्था अभियांत्रिकेद्वारे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड केली जाते. सर्वसाधारणपणे एक हजार चौरस फूट जागेत 250 मोठे, उंच, मध्यम आणि लहान अशा चार प्रकारच्या 40 पेक्षाही जास्त देशी पण दुर्मीळ वृक्षांची योग्य अंतरावर लागवड केली जाते. ज्यामध्ये कोणत्याही वृक्ष गटांचे वर्चस्व आढळत नाही.
सर्व आपआपसात स्पर्धा न करता समान पातळीवर वाढताना आढळतात. वृक्ष लागवडीत त्यांचे कूळ, जाती, प्रजातीची त्यांचे आपआपसातील अंतर आणि जमिनीखालून होणारी मूलद्रव्यांची देवाणघेवाण यास जास्त महत्त्व असते आणि हाच मुख्य फरक पारंपरिक वृक्ष लागवड आणि मियावाकी पद्धतीत आहे.
ही एक निसर्ग प्रयोगशाळाच आहे. ज्यामध्ये देशी वृक्षांची ओळख विद्यार्थ्यांना होतेच पण त्याचबरोबर वृक्ष संवर्धन आणि संरक्षणाचे धडेही त्यांना मिळतात. वृक्ष आणि शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये मैत्रीचा मजबूत धागा निर्माण होणे हा सध्याच्या वातावरणबदलावरचा प्रभावी उपाय असल्याचे माजी प्रांतपाल रमेश मेहेर यांनी सांगितले.