दोन महिन्यानंतर सापडला बेपत्ता बालक

दोन महिन्यानंतर सापडला बेपत्ता बालक

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

दोन महिन्यांपूर्वी येथील एसटी कॉलनी (ST Colony) परिसरातून बेपत्ता झालेला 12 वर्षीय कृष्णा दत्तू थोरे या मुलाचा सिन्नर पोलिसांनी (Sinnar Police) शोध लावून त्यास त्यांच्या आई-वडीलांच्या ताब्यात दिले आहे. एका मिस्ड कॉलच्या (Missed call) आधारे पोलिसांनी चक्र फिरवत मुंंबंईतील (mumbai) एका बाल सुधारगृहातून कृष्णाला ताब्यात घेतले.

कृष्णा हा 4 जून रोजी रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. सर्वत्र शोध घेऊनही तो सापडत नसल्याने त्याचे कुटुबिय चिंतेत होते. यासंदर्भात सिन्नर पोलिसांत बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली होती. पोलिसांच्या माध्यमातून राज्यभर या मुलाची माहिती देऊनही तो सापडला नव्हता. एके दिवशी अचानक एका अनोळखी क्रमांकावरुन कुटुंबियांच्या मोबाईलवर (mobile) मिस्ड कॉल (Missed call) आला.

शंकेची पाल चुकचुकल्याने त्याचे वडील दत्तू थोरे यांनी तपासी अधिकारी सचिन चौधरी यांना या क्रमांकासंदर्भात माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषकाद्वारे (Technical Analyst) या मोबाईलची (mobile) माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो बंद आल्याने तपासात अडथळे निर्माण झाले. या मोबाईल क्रमाकांची हिस्ट्री (History) तसापली असता त्यावर झालेल्या संपर्क क्रमाकाच्या आधारे पोलिस (police) मुबंई (mumbai) येथील माटुंगा परिसरात पोहचले.

तेथे रेल्वे पोलिशांची चर्चा केल्यानंतर कृष्णा नावाचा मुलगा डेव्हीड ससुन बालसुधारगृहात दाखल केल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनतर पोलिस उपनिरिक्षक सचिन चौधरी, राहुल हिगोंल, कृष्णाचे वडील या बालसुधारगृहात पोहचले. त्यानंतर कृष्णाला ताब्यात घेण्यात आले.

रेल्वे पोलिसांंचे काम संशयास्पद?

घरातून निघून गेल्यानंतर कृष्णा भांबवलेल्या स्थितीत फिरत असताना रेल्वे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने आपल्या आई-वडीलांचे नाव, गाव, मोबाईल नंबर सांगितल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून त्याला त्याच्या घरी सोडणे अपेक्षित होते. याउलट त्याला मारहाण करत एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बळजबरी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. वाट चुकलेल्या कृष्णाने ही माहिती पोलिसांसह नातेवाईकांना सांगितली. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला अशी वागणूक का दिली. त्याची रवानगी बालसुधारगृहात का केली याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com