शिक्षक पात्रता परीक्षार्थींना ‘जोरका झटका’

उत्तीर्ण झाल्याचा संदेश, पण यादीत नाव नाही
शिक्षक पात्रता परीक्षार्थींना ‘जोरका झटका’

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यातील सुमारे दोन ते अडीच हजार विध्यार्थ्यांना (students) ‘आपण शिक्षक पात्रता परीक्षेत (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झाला आहात’, असा संदेश आला. संदेश येताच उत्साहाच्या भरात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत (zilha parishad) दाखल झालेल्या विध्यार्थ्यांना ‘जोरका झटका’ बसल्याचा प्रत्यय आला.

शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा संदेश (Message) व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) प्राप्त होताच अनेक विद्यार्थी प्रमाणपत्र (Certificate) घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात (Department of Elementary Education) दाखल झाले. येथे आल्यानंतर या उमेदवारांना आपले नावच यादीत नसल्याचे बघून धक्का बसला. व्हॉट्सअ‍ॅपवर उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र दाखवून या उमेदवारांनी शिक्षण विभागाकडे (Department of Education) प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र, प्रत्यक्षात यादीत त्यांचे नावच नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे या उमेदवारांच्या लक्षात आले.

तुकाराम सुपे (Tukaram Supe) हे नाशिकला शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) असताना विभागातील शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडीचे वाटप करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील (Nashik district) मालेगाव (malegaon) व धुळे (dhule) जिल्ह्यात सर्वाधिक शालार्थ आयडी दिल्याचे समोर आले आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून निर्माण झालेले दलाल अजूनही कार्यरत असल्याने या शिक्षकांचे प्रस्ताव मान्यतेसाठी आल्यानंतर पुढे त्यांनी मान्यता दिल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

मूळात शालार्थ आयडी देण्यापूर्वी संबंधित शिक्षकाच्या टीईटी प्रमाणपत्राची पडताळणी करणे गरजेचे होते.मात्र, शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवलेल्या हजारो प्रस्तावांपैकी त्यांनी एकाही प्रस्तावास प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र, शिक्षकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे या प्रस्तावांची चौकशी झाली तरी नाशिक विभागातील किती शिक्षक बोगस आहेत, याची माहिती समोर येऊ शकते.

सण 2013 ते 2021 पर्यंतच्या शिक्षकांच्या मान्यतेत हा गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक बोगस ठरतील,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. फक्त टीईटी प्रमाणपत्रांपर्यंत हा घोटाळा मर्यादित झाल्याने त्याभोवती तपासयंत्रणा घुटमळत आहे. विभागातील धुळे, जळगाव व नाशिक जिल्ह्यात शालार्थ आयडीच्या नावाने मध्यस्थी करणार्या दलालांना ताब्यात घेतले तरी त्याची इत्यंभूत माहिती प्रकाश झोतात येईल. त्यामुळे सुपे यांना अटक होताच जिल्ह्यातील दलाल पसार झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com