पंचाळे l Pachale (वार्ताहर)

सिन्नर व निफाड तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी अनेक गावांमध्ये असलेले आठवडे बाजार बंद अधिसूचना प्रांताधिकारी डॉक्टर अर्चना पठारे यांनी जाहीर केले आहे.

यावर्षी डिसेंबर ते जानेवारी मध्ये राज्यभरातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड व सिन्नर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचा सदस्यांसाठी ग्रामपंचायत निवडणुका होत आहे.

येत्या शुक्रवार दिनांक 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असल्याने या दिवशी दोन्ही तालुक्यातील तीन गावातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे अथवा पुढे ढकलण्याचे आदेश निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनी बाजार बंदचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना पाठवले आहे.

त्यानुसार या आदेशाची अंमलबजावणी म्हणून निफाड तालुक्यातील गोंदेगाव व सिन्नर तालुक्यातील गुळवंच, पंचाळे येथील आठवडे बाजार पूर्णपणे बंद राहतील.

याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींनी आदेश काढले असून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे त्यामुळे येत्या शुक्रवारी असणारा बाजार बंद असल्याने संबंधित गावात व्यापाऱ्यांनी माल खरेदी विक्रीसाठी येऊ नये अशी सूचना ग्रामपंचायतीने केली आहे.

पंचाळे येथे पाच वर्षांपूर्वी पासून दर शुक्रवारी आठवडे बाजार सुरू करण्यात आला आहे. येत्या 15 जानेवारी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत असल्याने प्रांत अधिकारी यांच्या आदेशानुसार पंचाळे येथील आठवडे बाजार बंद राहणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार याबाबत व्यापारी व ग्रामस्थांना बाजार बंद बाबत सूचना देण्यात आलेल्या आहे.
पी आर शिरोळे, ग्रामसेवक, पंचाळे