नवीन कांदा खरेदीचा होणार शुभारंभ

नवीन कांदा खरेदीचा होणार शुभारंभ

उमराणे । वार्ताहर Umrane

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विजया दशमी - दसरा सणानिमित्त नवीन लाल कांदा खरेदी शुभारंभ रविवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती सचिव नितीन जाधव यांनी दिली.

बाजार समितीत दरवर्षी दसरा सणाच्या दिवशी नवीन लाल कांदा खरेदीचा शुभारंभ केला जातो. ही परंपरा यावर्षी देखील जपली जाणार आहे. कांदा व्यापारी नवीन लाल कांद्याची चढ्या भावात खरेदी करून शुभारंभ करत असतात. त्यामुळे नंबरला पहिली बैलगाडी लावण्यासाठीही शेतकरी बांधवांमध्ये देखील चढाओढ होत असते.

नवीन लाल कांद्याच्या खरेदीस प्रारंभ होत असल्याने शेतकर्‍यांनी आपला माल प्रतवारी करून फक्त नवीन लाल कांदा जुन्या मार्केट आवारात आणावा. कांदा प्रतवारी करून आणल्यास चांगला भाव मिळू शकेल. बाजार समितीत डाळींब, टोमॅटो व भाजीपाल्याचा लिलाव देखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कांद्यासह भाजीपाला विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सचिव जाधव यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com