ट्राफिक सिग्नल्सची देखभाल आता मनपाकडे; 'इतके' सिग्नल्स होणार दुरुस्त

ट्राफिक सिग्नल्सची देखभाल आता मनपाकडे; 'इतके' सिग्नल्स होणार दुरुस्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

ट्राफिक सिग्नलमुळे (Traffic signal) शहरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या (traffic jam) कटकटीतून नाशिककरांची सुटका होणार आहे. खासगीकरणातून (Privatization) शहरातील ४३ सिग्नल्सच्या देखभाल, दुरुस्तीला (Maintenance, repair) महासभेने हिरवा कंदील दिला आहे.

वाहतुकीच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी शहरात प्रमुख रस्त्यांवरील विविध ठिकाणी असलेल्या ४७ चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्यात आले आहेत. यांपैकी चार सिग्नल्सचे व्यवस्थापन सिग्नल्सचे व्यवस्थापन महापालिकेच्या (Municipal Corporation) माध्यमातून केले जाते.

सिग्नल बंद पडल्यास संबंधित चौकामधील वाहतूक विस्कळीत होते. परिणामी शहरात वाहतूक कोंडी (traffic jam) निर्माण होते. शहरातील सात सिग्नल्स गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे त्या-त्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनधारकांना लहान- मोठ्या अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com