
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला असून काल बेळगावच्या हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत...
नाशिकमध्येही या घटनेचे पडसाद उमटले असून शहरातील कर्नाटक बँक (Karnataka Bank) समोर स्वराज्य संघटनेने आंदोलन केले आहे. तसेच बँकेच्या बोर्डाला काळं फासण्यात आले आहे.
नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या कर्नाटक बँकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारसह कन्नड रक्षण वेदिका संघटनेविरोधात रोष व्यक्त केला आहे.