रस्ता दुरूस्तीसाठी चॉकलेटचे आमिष

रस्ता दुरूस्तीसाठी चॉकलेटचे आमिष

मनपा आयुक्तांना मुलांचे भावनिक साकडे

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

सोयगाव-कॅम्प (Soygaon-Camp) प्रभागातील डिके परिसरासह विविध वसाहतीतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे (Bad road conditions) त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी (Students) सायकलींसह मनपात धडक देत आयुक्त भालचंद्र गोसावी (Commissioner Bhalchandra Gosavi) यांना रस्ते दुरूस्तीसाठी (Road repairs) चक्क चॉकलेट (Chocolate) देण्याचे आमिष दिले. काका आमच्या घराजवळील रस्ता दुरूस्त करा आम्ही सर्व तुम्हाला चॉकलेट देवू असे सांगत या चिमुरड्यांनी वसाहतीतील रस्त्यांसह विविध समस्यांसह आयुक्तांचे लक्ष वेधले.

दरम्यान, लहान विद्यार्थ्यांनी मनपा गाठत केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयुक्त गोसावी यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना दुरध्वनी करत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पृच्छा करत कामाची चौकशी (Work inquiry) केली. येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू झालेले दिसून येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच या विद्यार्थ्यांनी त्यांच्या दालनातून काढता पाय घेतला.

कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात येवून देखील शहरातील जवळपास सर्व प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. प्रमुख रस्त्यांवर असलेले खड्डे पावसाच्या पाण्यामुळे दिसत नसल्याने अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ होवून अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे. दरवर्षी खर्च होणारा कोट्यवधी रूपयांचा निधी (Fund) नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे (Poor quality work) खड्ड्यात जात असून ठेकेदाराचे भले करणारा ठरत असल्याने जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.

डी.के. चौक ते सोयगाव सबस्टेशन, आयकर कॉलनी, जयरामनगर, विष्णू नगर, मोरया कॉलनी, प्रगती कॉलनी, आदर्श नगर, भाऊसाहेब नगर आदी वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विद्यार्थी सायकलीवरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. खड्ड्यांमुळे सायकली देखील सतत पंक्चर व नादुरूस्त होत असल्यामुळे त्रस्त झालेल्या दिया ठाकरे, सर्वेेश वाघ, भुमी रत्नपारखी, अनन्या निकम, रिया निकम, मल्हार ठाकरे आदी विद्यार्थ्यांनी

मनपात धाव घेत आयुक्तांना निवेदन सादर करत रस्ता दुरूस्त झाल्यास चॉकलेट देण्याची ग्वाही दिली. यावेळी परिसरात रस्त्यांच्या दुरवस्थेसह डास, मच्छरांचे असलेले साम्राज्य तसेच जंतूनाशक फवारणीसाठी देखील कोणतेच काका येत नसल्याची तक्रार या विद्यार्थ्यांनी आयुक्तांजवळ केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com