घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड केले लंपास

घराचे कुलूप तोडून दागिने व रोकड केले लंपास

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने (thief) घरफोडी (burglary) करून सोन्याचांदीचे दागिने (jewelry) व रोकड (cash) असा ६२ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना नवीन नाशकात (navin nashik) घडली आहे.

फिर्यादी संतोष मनोहर पगारे (रा. एकता चौक, नवीन नाशिक) हे दि. १० ते १७ मार्चदरम्यान कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप (lock) कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील कपाटात असलेले चार हजार रुपये किमतीचे सोन्याचे ओम पान, पाच हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे कानातील दागिने, सहा हजार रुपये किमतीचे २० भार वजनाचे चांदीचे चार कडे, दोन हजार रुपये किमतीची चांदीची चैन, तीनशे रुपये किमतीची चांदीची गणपती मूर्ती,

पाचशे रुपये किमतीचे पायातील जोडवे, २० हजार रुपये किमतीच्या घरगुती विक्रीसाठी आणलेल्या ३५ साड्या व २५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ६२ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी (burglary) करून चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा (Crime of burglary) दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक शिरवले करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com