इंदिरानगर राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार

खा.गोडसेंकडून केंद्राला प्रस्ताव सादर 40 कोटींचा खर्च
इंदिरानगर राणेनगर बोगद्यांची लांबी वाढणार

देवळाली कॅम्प । वर्ताहर | Deolali Camp

नाशिक शहरातील (nashik city) इंदिरानगर (indira nagar), राणेनगर (rane nagar) ,लेखानगर (lekha nagar), दिपालीनगर (dipali nagar) या भागातील सतत होणार्‍या वाहतुक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्यास

केंद्राच्या संबंधित विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, याबाबदचा प्रस्ताव सादर केला आहे. यामुळे दोनही बोगद्यांची लांबी प्रत्येकी पंधरा मीटरने वाढणार असून एक- एक बोगदा चाळीस मिटर लांबीचा होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी दिली.

राणेनगर आणि इंदिरानगर हे दोन्ही बोगदे (tunnel) नाशिक मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway) आहेत. सिडको (CIDCO) आणि शहर यांना जोडणारे हे दोनही बोगदे आहेत .बोगद्याचा वरील बाजूस महामार्ग असून बोगदयांना समांतरही महामार्ग आणि दोन्ही बाजूस सव्हिसरोड (service road) आहेत. शहराच्या मुख्य दोन उपनगरांना जोडणारे हे बोगदे असल्याने सकाळ-संध्याकाळ या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी (Traffic congestion) होत असते. तासनतास या बोगदे परिसरातील वाहतूकीच्या कोंडीत (Traffic Jam) वाहने अडकून पडत असतात .यामुळे वेळेचा अपव्यय होऊन पेट्रोलची (petrol) मोठी नासाडी होत असते. परिनामी वाहनधारकांची मोठी कुंचबना होत असते. या जाचातून वाहनधारकांची कायमचीच सुटका करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील आहेत.

वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना खासदार गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाला (National Highway Administration) दिले होत्या. राणेनगर, इंदिरानगर येथील बोगदे शिवारात वाहतुकीची कोंडी का होते याचे कारणे शोधण्यात आली असून यातूनच बोगद्यांची लांबी वाढवण्याचा निर्णय नॅशनल हायवे प्रशासनाने (National Highway Administration) घेतला आहे.

आज मितीस दोन्ही ठिकाणच्या बोगद्याची लांबी 25 मीटर इतकी असून आता प्रत्येक बोगद्याच्या मागील आणि पुढील बाजूस साडेसात मीटर बोगद्याची लांबी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक बोगद्याची लांबी आता 25 मीटरच्या ऐवजी 40 मीटर इतकी होणार आहे. या कामी सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासदार गोडसे यांच्या सूचनेवरून नॅशनल हायवे प्रशासनाने याविषयीचा प्रस्ताव तयार केला आहे. खा गोडसे यांनी आज हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com