लॉन्ड्री मालकाचा असाही प्रामाणिकपणा

लॉन्ड्री मालकाचा असाही प्रामाणिकपणा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

येथील रॉयल लॉन्ड्रीचे (Royal Laundry) मालक कैलास बुंदले (Kailash Bundle) यांनी ग्राहकाच्या कपड्यात सापडलेला तीस हजारांचा बेअरर चेक (Bearer check for thirty thousand) संबंधित मालकाला परत करत व्यवसायातील प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे...

गेल्या 70 वर्षांपासून बुंदले परिवाराचे देवळालीतील होसनरोडवर रॉयल लॉन्ड्री हे दुकान आहे. लष्करी अधिकारी, जवान यांसह सर्वसामान्य नागरिकांचेदेखील कपडे या लॉन्ड्रीत नियमितपणे येत असतात. बुंदले परिवाराने आजपर्यंत कपड्यांमध्ये सापडलेल्या रोख रकमा, महत्त्वाचे कागदपत्रे, दागिने व चेक हे वेळोवेळी परत केलेले आहेत.

एका ग्राहकाच्या कपड्यांमध्ये तीस हजारांचा बेअरर चेक सापडून आला असता संबंधित मालकाशी संपर्क साधून तो कैलास बुंदले यांनी परत केला. बुंदले यांच्या प्रामाणिकपणाबाबत देवळाली कॅम्प परिसरातील व्यापारी व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com