देवदरीला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प

13 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
देवदरीला सर्वात मोठा सिंचन प्रकल्प

येवला । प्रतिनिधी Yevla

तालुक्यातील देवदरी येथील देवनाचा सिंचन प्रकल्पासाठी राज्य शासनाची 13 कोटी 77 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रकल्पासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. 358 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे.

देवनाचा सिंचन प्रकल्पासाठी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रशासकीय मान्यतेचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, प्रधान सचिव जलसंधारण यावेळी उपस्थित होते.

देवनाचा सिंचन प्रकल्पा साठी कृती समिती अध्यक्ष भागवतराव सोनवणे या प्रकल्पासाठी 2012 साला पासून नियोजन बध्द पाठपुरावा करत होते.2014 मध्ये झालेले सत्तांतर यामुळे हा प्रकल्प साठी ची गती मंदावली होती.

मात्र ना.भुजबळ मंत्री होताच पुन्हा या प्रकल्पाला चालना मिळाली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देवनाचा कृती समिती व लाभार्थी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केली आहेत.या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष 358 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: या प्रकल्पासाठी लक्ष घातल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

20 जानेवारी 2014 रोजी तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून जलविज्ञान संस्थेचे या प्रकल्पासाठी 65 दशलक्ष घनफुट (1840 सहस्त्र घन मिटर) क्षमतेचे प्रमाण पत्र जलविज्ञान संस्था, नाशिक यांनी दिले आहे. कृती समितीचे अध्यक्ष भागवतराव सोनवणे यांनी तापी खोर्‍यातील, येवला तालुक्यातील 1951 ते 2013 या 62 वर्षातील पर्जन्यमान, मन्याड अणि गिरणा उपखोर्यात बृहत आराखड्यातील पुर्ण झालेल्या प्रकल्पांचा पुर्ण झालेल्या वर्षांपासूनच ओव्हर फ्लो मिटर गेज तपशील, प्रस्तावित प्रकल्पांची क्षमता या आधारे युक्तीवाद करुन प्रमाण पत्र मिळवले होते.

असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प

एकुण खर्च मान्यता 12 कोटी 77 लाख

लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी

सिंचन क्षमता 358

उपलब्ध होणारे पाणी 65.33 दश लक्ष घनफुट

धरणाची लांबी 225 मीटर

धरणाची उंची 16.18 मीटर

सांडव्याची लांबी 90 मी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com