कुसुमाग्रज वाचनालय पाच वर्षांपासून बंदच

शिरवाडे वणी ग्रामस्थांना ज्ञानमंदिर उघडण्याची प्रतीक्षा
कुसुमाग्रज वाचनालय पाच वर्षांपासून बंदच

शिरवाडे वणी । वार्ताहर | Shirvade Vani

शिरवाडे वणी (Shirvade Vani) उर्फ शिरवाडकर नगर या गावाचा मातीचा कण न कण कविवर्य कुसुमाग्रजांच्या (Poet Kusumagraj) पदस्पर्शाने पावन झाला असून अशा थोर कवी व साहित्य शिरोमणी तात्यासाहेब तथा वि.वा. शिरवाडकर (V.Va. Shirwadkar) यांच्या नावाने अनेक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या वाचनालयाचे दार उघडत नसल्यामुळे वाचकांचा भ्रमनिराश होत आहे.

शिरवाडे वणी हे गाव नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) अग्रभागी दिंडोरी (dindori), चांदवड (chandwad), निफाड (niphad taluka) तालुक्याच्या सरहद्दीवर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Agra National Highway) क्रमांक तीन लगत काजळी नामक नदीच्या तीरावर येत असून कविवर्य कुसुमाग्रजांच्या नावामुळे कायापालट झालेले गाव आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने गावामध्ये अनेक संस्था असून त्याकाळी गावातील शंभर टक्के लोक साक्षर रहावे. तसेच गावातील लोकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी तात्यासाहेबांनी गावात एकेकाळी वाचनालय (Library) सुरू केले होते.

ग्रामस्थांनी त्याला कुसुमाग्रज वाचनालय (Kusumagraj Library) असे नाव दिले होते. परंतु खासगी जागेत वाचनालय असल्यामुळे त्याची देखभाल होत नसल्यामुळे ते बंद पडले व स्वतंत्र इमारत नसल्यामुळे ते कुठे ठेवावे असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला होता. परंतु ही सर्व परिस्थिती लक्षात घेता 2006 ते 2007 या दरम्यान कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने

आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर नितांत प्रेम करणारे त्यांचे चाहते व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश बाबा पाटील (Senior BJP leader Suresh Baba Patil) यांनी वाचनालयाच्या इमारतीसाठी 10 लाख रुपयांचा निधी (fund) देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी व शब्द पाळून राज्यसभेतील दिवंगत खासदार बाळ आपटे (MP Bal Apte) यांच्या निधीतून उपलब्ध करून वाचनालयाची भव्य इमारत कुसुमाग्रज स्मारक परिसरात उभारून देण्यात आली आहे.

गावातील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहे. परंतु मधल्या कालखंडात वाचनालय बंद पडल्यामुळे आता सुरू करण्यासाठी गावातील काही कार्यकर्त्यांच्या तू तू मै मै यामुळे वाचनालये सुरू करण्यासाठी दिरंगाई होत आहे. वाचनालय सुरू केल्यास तरुण वर्गापासून थेट विद्यार्थी, प्रौढ व्यक्ती व विविध प्रकारच्या वाचकांना त्याचा निश्चितच फायदा मिळणार आहे. कुसुमाग्रज स्मारक परिसरात मोठ्या दिमाखाने आता त्यांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले जातात.

नुकत्याच झालेल्या कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त कुसुमाग्रज स्मारक पूर्णत्वाला जाण्यासाठी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा निफाड तालुक्याचे आमदार दिलीप बनकर यांनी 2 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून स्मारकाचे काम लवकरच पूर्णत्वाला जाणार आहे. कुसुमाग्रज वाचनालय हे स्मारक परिसरात असून वाचनालयाची इमारत गेल्या चार ते पाच वर्षांपासून बांधून ठेवण्यात आली आहे.

त्या इमारतीची देखभाल होत नसल्यामुळे सध्या तरी ती आता धूळखात पडली आहे. वेळोवेळी कुसुमाग्रजांचे चाहते पर्यटक व त्यांच्यावर प्रेम करणारे लोक येथे येवून भेट देत असतात व वाचनालयाची खंत व्यक्त करत असतात. वाचनालयाचे दार उघडत नसल्यामुळे वाचकांचा भ्रमनिराश होत आहे. त्यामुळे सदरचे वाचनालय सुरू होण्यासाठी ठोस प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com