
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
शहरातील मध्य भागातून जाणार्या सरस्वती नदीपात्राला (Saraswati River) सध्या मोठ्या प्रमाणावर गवताने वेढा दिला असून यामुळे नदीचा प्रवाह थांबला आहे. शहरातील व्यावसायिक व नागरिकांकडून नदीपात्रात टाकल्या जाणार्या, सडलेला भाजीपाला (vegetables), फळे (fruits) व इतर कचर्यामुळे सर्व नदीपात्रालगत दुर्गंधी पसरली आहे.
नदीला गटारीचे स्वरुप प्राप्त झाले असून ठिकठिकाणी दलदल झालेली बघायला मिळत आहे. मात्र, नगर परिषदेकडून (nagar parishad) त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सिन्नरकरांची (sinnar) जीवनदायीनी मानल्या जाणार्या सरस्वती नदीची आज दुरवस्था झाली असली तरी यासाठी प्रशासनाकडून कुठलीही पाऊले उचलली जात नसल्याचे दिसत आहे.
काही वर्षांपूर्वी नगर परिषदेने (nagar parishad) बाराद्वारीजवळ नदीपात्रात बंधारा घालत पाणी अडवले आहे. मात्र, आज या ठिकाणी साचलेल्या पाण्यावर पूर्णपणे शेवाळ व प्लास्टिकचा कचरा (Plastic waste) जमा झालेला दिसून येतोय. यापुढे आल्यास खासदार पुलापर्यंत नदीपात्राला पूर्णपणे गवताने वेढा दिला असून यात मोकाट जनावरे, कुत्री, डुक्करे फिरताना दिसतात. पात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून तो काढलाही जात नसल्याने पूर्णपणे सडून गेला आहे.
त्यामुळे नदीपात्रालगत दुर्गंधी पसरली असून रस्त्याने ये-जा करणार्या व शहरात खरेदी करण्यासाठी येणार्यांना नाक दाबूनच येथून जावे लागत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांत पाऊसही सुरु होणार असून नदीपात्रातील कचर्यामुळे पाणी तुंबून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीला पूर आल्यास हे पाणी बाजार पेठेतही घुसून व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषदेने नदीपात्रातील गवत, कचरा साफ करुन नदीचे पात्र मोकळे करण्याची मागणी होत आहे.
त्वचारोग जडण्याची शक्यता
शहर व परिसरातून जाणार्या 3 मुख्य नद्या सरस्वती, देवनदी, शिवनदी या आहेत. या 3 नद्यांंचा संगम शहरापासून काही किलोमीटर अंतरावरील कुंदेवाडी परिसरात होतो. या संगमावर स्नान केल्यास त्वचारोग व इतर व्याधी दूर होत असल्याची आख्यायिका आहे. यासाठी तालुकाभरातील भाविक याठिकाणी जाऊन स्नान करतात. मात्र, सरस्वती नदीतील दूषित पाणी पुढे जाऊन देवनदी व शिवनदीत मिसळत असल्याने त्या नदीतील पाण्याचेही प्रदूषण होत असून संगमावर स्नानासाठी येणार्या भाविकांचा त्वचारोग नाहीसा होण्याऐवजी दुसराच रोग जडण्याची भीती वर्तवली जात आहे.