नाशिक
Photo Gallery : चिमुकल्यांसह मोठ्यांनी लुटला पतंग उडविण्याचा आनंद
नाशिक | Nashik
नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांती (Makar Sankrant) निमित्त शहरातील विविध ठिकाणी आज तरुण-तरुणींसह चिमुकले पतंग उडविण्याचा आनंद लुटतांना पाहायला मिळाले...
शहरातील रविवार कारंजा, मेनरोड, नवीन नाशिक, पंचवटी, सातपूर या परिसरात लहानांपासून तर मोठ्यापर्यंत अनेक नागरिक पतंग (Kite) उडवताना दिसले. तसेच काहीजण एकमेकांच्या पतंगाचा दोरा कापतांना दिसले. तर चिमुकल्यांमध्ये कापलेले पतंग धरून ठेवण्यासाठी स्पर्धा सुरु होती.