जात पंचायतने एक रुपयात केला महिलेचा घटस्फ़ोट

पतीने केले दुसरे लग्न
जात पंचायतने एक रुपयात केला महिलेचा घटस्फ़ोट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पहिल्या पत्नीचा ( divorce ) घटस्फ़ोट झाला नसतांना पतीने दुसरे लग्न केल्यास तो गुन्हा ठरतो. परंतु हे जात पंचायतीला ( Jat Panchayat)मान्य नाही. फोनवर घटस्फ़ोट केल्याचा घृणास्पद प्रकार सिन्नर येथे घडला.

सिन्नर ( Sinnar ) येथील अश्विनी या महिलेचे लोणी ( अहमदनगर) येथे लग्न झाले होते. लग्नानंतर सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती माहेरी सिन्नर येथे आली.याचा फायदा घेऊन सासरच्या लोकांनी लोणी व सिन्नर येथे वैदू समाजाची जात पंचायत बसवली.

जात पंचायतीने सदर महिलेला न विचारता तिच्या अनुपस्थितीत तिचा घटस्फ़ोट केला. त्यासाठी सासरकडील लोकांनी भरपाई केवळ एक रुपया पंचांकडे दिला. जात पंचायतीने सदर महिलेला पोलीस ठाण्यात जाण्यापासुन रोखले. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने न्यायालयीन प्रकियेत न्याय मागणे तिला अवघड गेले.

आठ दिवसांपूर्वी तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याने तिला अन्याय असह्य झाला. सामाजिक कार्यकर्त्यामुळे ही बाब समोर आली आहे.न्यायालयाने घटस्फ़ोट दिला नसतांना पंचांच्या भूमिकेमुळे पतीने दुसरे लग्न केले. त्यामुळे जात पंचायतच्या पंचांचा विरोध मोडून काढत ती लढायला तयार झाली जातपंचायतीचे पंच व सासरचे या विरोधात तक्रार करायला तयार करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (Maharashtra Anti-Superstition Committee )जात पंचायत मूठमाती अभियानचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे व अ‌‍‌‍ॅॅड रंजना गवांदे हे मदतीसाठी पुढे आले आहे.

राज्य सरकारने जात पंचायतच्या मनमानी ला आळा घालण्यासाठी सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा बनविला परंतु जात पंचाच्या दहशत समाजात अजुनही कायम आहे. प्रबोधनासोबत सदर कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास जात पंचायतींना मूठमाती देता येईल

- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह,जात पंचायत मूठमाती अभियान .

- Krishna Chandgude, State Administrator, Jat Panchayat Muthamati Abhiyan.

Related Stories

No stories found.