आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न निकाली

आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न निकाली

पालकमंत्री छगन भुजबळ यांची मध्यस्थी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आकाशवाणी भाजी मार्केटचा चिघळलेला प्रश्न निकाली काढण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भुजबळ फार्म येथे महापलिका आयुक्त व अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

न्यायालयीन आदेशाचे पालन करून आकाशवाणी भाजी मार्केट आहे त्याच ठिकाणी सुरु ठेवून याठिकाणी पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश भुजबळ यांनी मनपा आयुक्त कैलास जाधव व सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला माजी खासदार समीर भुजबळ, महापलिका आयुक्त कैलास जाधव, उपायुक्त विजय पगार, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे, नगर रचना विभागाचे कार्यकारी अभियंता राजू आहेर आदी उपस्थित होते.

आकाशवाणी भाजी मार्केटच्या प्रश्नांवर भाजी विक्रेत्यांनी भुजबळ यांना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी काढण्यात यावा अशी मागणी केली होती. त्याअनुषंगाने भुजबळ यांनी मनपा आयुक्तांसमवेत अधिकाऱ्यांशी बैठक बोलावली होती. बैठकीत आकाशवाणी भाजी मार्केट येथील भाजी विक्रेत्यांना आहे त्याच ठिकाणी भाजी विकण्याची परवानगी देण्यात यावी.

तसेच येथील पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात नियोजन करून महानगरपालिकेकडून स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून देण्यात यावी असे निर्देश महापलिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले आहे. त्यामुळे आकाशवाणी भाजी मार्केटचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com