नाशिक । प्रतिनिधी Nashik

उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा प्रकोप महाराष्ट्रात जाणवत आहे. परिणामी गेल्या तीन -चार दिवसापासून मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आज काहीशी कमी झाली.

राज्यात किमान तापमान 7 वरुन काल (दि.25) 9 अंशावर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पारा 8.2 वरुन 10.6 अंशावर वर आला आहे. निफाडचा पारा 11 अंशावरआला. यामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.

जम्मु काश्मिर पासुन उत्तराखंड पर्यत उत्तरेत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे निर्माण झालेल्या शितलहरीचा प्रकोप शेजारील राज्यांना जाणवत आहे. परिणामी राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 7 ते 8 अशांपर्यत खाली आले होते. उत्तर महाराष्ट्रात नाशिकला दि.23 रोजी किमान तापमान 8.2 अंशापर्यत व निफाड याठिकाणी 6.5 अंशावर पारा खाली आला होता.

प्रमुख शहरांचे तापमान

गोंदिया 9.4

नागपुर 10.1

नाशिक 10.6

परभणी 11.9

पुणे 11.9

मालेगांव 12.4

अकोला 11.4

जळगांव 13.0