सोमवार पासून उद्योगक्षेत्र होणार सुरू

लघुउद्योगांना कर्जमाफीची अपेक्षा
सोमवार पासून उद्योगक्षेत्र होणार सुरू

सातपूर । प्रतिनिधी

उद्योगक्षेत्राला राज्य शासनाने आदेशित केलेले निर्बंध लागू राहणार असून त्या माध्यमातून कामगारांना करोनापासून बचावासाठी केलेल्या उपाययोजनाची म्हणजेच सुरक्षित अंतर, लसीकरण अशा विविध तरतुदींबाबत सविस्तर माहिती कार्यालयात देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. उद्योगक्षेत्रात या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याने उद्योजकांनी सुस्कारा सोडला आहे.

जिल्ह्यातील उद्योग येत्या सोमवारपासून सुरळीत सुरू होणार आहेत. उद्योगांसाठी असलेले विशेष निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य शासनाने लागू केलेल्या सर्व करोना नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कारखान्यात येणार्‍या प्रत्येक कामगारांबाबत घेत असल्याचे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती उद्योगाने घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनास दिल्या आहे.

शासनाने उद्योगक्षेत्र सुरू करण्याच्या निर्णयामुळे उद्योगांची कोंडी सुटणार आहे. उद्योगक्षेत्र सुरू होणार असली तरी लघु-मध्यम उद्योजकांचे प्रश्न मात्र जटिल होत चालले आहेत. उद्योगा समोर असलेली आव्हाने व त्यांना तोंड देण्यासाठी उद्योगांच्या खात्यात असणारे भांडवल यांचा मेळ बसणे कठीण होणार आहे. जून महिना असल्याने शासनाचे विविध कर भरण्याची तारीख जवळ येणार आहे. वीज मंडळाचा अतिरिक्त भार जीवघेणा ठरणार आहे.

उद्योगक्षेत्राला शासनाचे कर, विजेचे भार कामगारांचे वेतन यांचा मेळ बसवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. शासन स्तरावरून त्यांना सक्षमीकरण यासाठी विशेष मदत करण्याची अपेक्षा आहे. त्यात प्रामुख्याने शासनाचे विविध कर वीज मंडळाचे भार माफ करण्याची तरतूद करण्याची करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

उद्योगक्षेत्र सुरू करण्यातून शासनाने जाचक अट रद्द केल्यामुळे छोट्या उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रत्येक उद्योगात कामगारांची सर्व तरी काळजी घेत असतो. मात्र त्यासाठी कुटुंबियांची काळजी घेणे ही जाचक अट होती. ती शिथिल झाली हे समाधान कारक आहे.

ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष आयमा

बंद काळामध्ये मोठे उद्योग टिकाव धरू शकतात. मात्र लघु, मध्यम उद्योगांना सर्वच पद्धतीने भार पडत असल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. शासन स्तरावरून विविध कर भरण्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याची भावना लघुउद्योजक व्यक्त केली आहे. बँकांचे व्याज माफ करणे, शासनाचे प्रॉपर्टी कर, इतर कर माफ करणे याबाबत विचार होण्याची गरज आहे.

अभय कुलकर्णी, माजी अध्यक्ष निमा

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com