नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात गेल्या सात दिवसात मोठ्या प्रमाणात करोना प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून गेल्या 2 दिवसात 600 नवीन रुग्ण वाढल्याचे महापालिकेची चिंता वाढली आहे.

गेल्या सात दिवसात 1409 नवीन रुग्णांची भर पडली आहे. या कालावधीत उपचार घेणार्या रुग्णांची संख्या 1020 वरुन 1711 पर्यत जाऊन पोहचली आहे. दरम्यान भोसला मिलीटरी कॉलेज मधील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना करोना झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महाविद्यालये काही दिवस बंद करण्यासंदर्भातील सुचना महापालिका प्रशासनाकडुन जिल्हा प्रशासनाला करण्यात आलीआहे.

नाशिक शहरातील शाळा - महाविद्यालयात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होऊ लागल्याचे कॉलेज परिसरात दिसु लागली आहे. तसेच अलिकडेच झालेल्या शिवजयंती सोहळ्यातील गर्दी व सभा - सभारंभ, लग्नांतील गर्दी याचे परिणाम आता करोना संसर्गातून दिसु लागले आहे. यातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्कातून 11 जणांना बाधा झाली आहे. तसेच भोसला मिलीटरी कॉलेज वसतीगृहातील 6 मुले करोना बाधीत आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 51 जणांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अंहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

असे असले तरी गेल्या तीन आठवड्यात उच्चांकी असे 366 इतके नवीन रुग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचे काम वाढले आहे. 25 फेब्रुवारी रोजी 260 आणि आज 366 असे 626 नवीन रुग्ण दोन दिवसात वाढले आहे. यावरुन शहरात करोना संसर्ग झपाट्याने वाढु लागला आहे. अद्यापही नागरिक मास्कचा वापर करीत नसल्याने व सॅनेटाईजरचा वापर न करता व सामाजिक अंतर न ठेवता वावरत असल्याने मोठा धोका निर्माण केला आहे.

नागरिकांना शिस्त लागावी म्हणुन महापालिका, पोलीस व महसुल यांच्या पथकाकडुन मास्क न वापरणार्यांकडुन 1 हजार रुपयांचा दंड वसुल केला जात आहे. यात काल (दि.26) मनपाच्या पथकांने मास्क न वापर्या 150 जणांकडुन प्रत्येक हजार रुपये यानुसार 1 लाख 50 हजार रुपयांचा दंड वसुल केला. यात ना.रोड विभागातून 57 केसेस व 57000 रुपये दंड, ना.पश्चिम विभागात 23 केसेस व 23000 रु. दंड, ना. पूर्व विभागात 25 केसेस व 25000 रु. दंड, नवीन नाशिक विभागात 19 केसेस 19000 रु. दंड, पंचवटी विभागात 12 केसेस व 12000 रु. दंड आणि सातपूर विभागात 14 केसेस व 14000 रु. दंड अशी दंडाची कारवाई करण्यात आली आली.