‘पंचवटी’चा प्रवास खडतर

‘पंचवटी’चा प्रवास खडतर

अस्वच्छता, साहित्याची मोडतोड; ‘राज्यराणी’तही असुविधा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये (Panchavati Express) कायम अस्वच्छता (Uncleanliness) असल्याने प्रवासी नाराज आहेत. त्यांचे आरोग्य (health) धोक्यात आले आहे. गाडी नियमित स्वच्छ ठेवावी, योग्य तेथे दुरुस्ती-देखभाल करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

याबाबत नाशिक (nashik) पासधारक (Pass holder) आणि प्रवासी वेल्फेअर असोसिएशनने रेल्वेचे (Railways) मुंबई मुख्यालय (Mumbai Headquarters) आणि भुसावळ (bhusawal) विभागीय अधिकार्‍यांना निवेदन (memorandam) दिले आहे. निवेदनावर अध्यक्ष राजेश फोकणे, उपाध्यक्ष किरण बोरसे, कैलास बर्वे, संजय शिंदे, दीपक कोरगावकर, क्रांती गायकवाड आदी पदाधिकार्‍यांची नावे आहेत.

निवेदनाचा आशय असा, पंचवटीमधून रोज अनेक नाशिककर मुंबईला रोजगारासाठी प्रवास करतात. पंचवटीला लोकल गाड्यांप्रमाणे इंटरसिटी ट्रेनचा (Intercity train) दर्जा असतानाही अस्वच्छता आणि असुविधा आहेत. बोगी आतून व बाहेरून पुसल्या जात नाहीत, पाण्याने स्वच्छ केल्या जात नाहीत. हीच गाडी जालना जनशताब्दी (Jalna Janshatabdi) प्रवासासाठी वापरली जाते. त्यामुळे अस्वच्छता वाढली आहे. काही साहित्याची मोडतोड झालेली आहे.

मुंबई प्रवासासाठी राज्यराणी एक्स्प्रेसचाही (Rajyarani Express) नाशिककर वापर करतात. नांदेड (nanded) येथून सुटल्यावर मनमाड येथे राज्यराणीच्या दहा बोगी उघडल्या जातात. त्यांचीही स्वच्छता केली जात नाही. स्वच्छतागृहांमध्येही दुर्गंधी असते. या दोन्ही गाड्यांची नियमित स्वच्छता केली जात नसल्याने प्रवाशांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे. करोनासारखे साथीचे आजार सुरू असल्याने रोजच्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.

सिन्नरफाटा गेट बंद

नाशिकरोड रेल्वेस्थानकातील प्लॅटफार्म (Platform) क्रमांक चारवरील सिन्नरफाटा (sinnarphata) येथील गेट बंद असल्याने पंचवटी (panchavati), राज्यराणी व अन्य गाडीच्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. ते सुरू करण्याची मागणी या संघटनेने पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. पंचवटी आणि राज्यराणीच्या प्रवाशांसाठी सकाळी सकाळी प्रत्येक मिनीट मोलाचा असतो.

ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens), दिव्यांग यांना धापा टाकत मोठा वळसा घालून स्थानकात यावे लागते. सिन्नरफाटा गेटजवळ रिझर्व्हेशन कार्यालय (Reservation office) आहे. तेथून तिकीट घेऊन लगेच रेल्वेस्थानकात (Railway station) प्रवेश करायचा झाल्यास प्रवेशद्वार बंद असल्याने निराशा होते. प्रवाशांना एक किलोमीटर वळसा घालून पश्चिमेकडील आंबेडकर पुतळा येथील मुख्य प्रवेशद्वारातून स्थानकात यावे लागते.

रेल्वे प्रशासनाला अनेकदा पत्र लिहूनही दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. सिन्नरफाटा प्रवेशद्वार परिसरात रिझर्व्हेशन कार्यालयासमोर रेल्वेने पटांगण विकसित केले आहे. शेजारीच नवीन बसस्थानकही महापालिका उभारत आहे. पंचवटी आणि राज्यराणी एक्स्प्रेसची वेळ लक्षात घेऊन हे प्रवेशद्वार पहाटे सहा ते रात्री साडेदहापर्यंत खुले ठेवणे गरजेचे आहे, असे संघटनेने पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com