शेतकरी, वाहनचालकांची गैरसोय टळणार

पालखेड - मोेहाडी रस्ता रुंदीकरणास प्रारंभ
शेतकरी, वाहनचालकांची गैरसोय टळणार

पालखेड बं. । बापू चव्हाण Palkhed-Dindori

सध्या पालखेड कॉलनी (Palakhed Colony) ते मोहाडी (mohadi) या रस्त्याची अवस्था अतिशय नाजूक झालेली होती. त्यामुळे नागरिकांनी व शेतकर्‍यांनी (farmer) या रस्त्याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधींना व संबंधित खात्याकडे तक्रार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. गेली अनेक वर्षांपासून हा रस्ताच कामाची प्रतीक्षा करत होता. या मार्गाचे रुंदीकरण (Road widening) सुरू झाल्याने गैरसोय दूर होणार आहे.

अनेक वेळा या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळत होती मात्र कोणतेही ठेकेदार हे काम करण्यास तयार नसल्यामुळे हा रस्ता खितपत पडलेला होता. मात्र उशिरा का होईना या महत्वाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याने शेतकर्‍यांनी वाहनचालकांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने या महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक वेळा डागडुगी करण्यात येत होती परंतु झालेल्या पावसाने दाखवून दिले की संबंधित ठेकेदार (Contractor) रस्त्याची कामे कशी करतात करोणाच्या नावाखाली निधीच्या (fund) कमतरतेमुळे

रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडत नव्हता परिणामी येथील शेतकर्‍यांना व नागरिकांना कायम मनस्ताप करावा लागत होता. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे सांगणे कठीण झाले होते. अखेर करोनाचा संसर्ग ओसरू लागल्याने निधी उपलब्ध होऊन रस्त्याच्या कामाला गती मिळाली गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. मात्र सध्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येत असल्याने या रस्त्याचे दर्जेदार स्वरूपाचे काम व्हावे अशी मागणी शेतकरी वाहनचालक प्रवासी करत आहे.दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) पूर्व भागातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यांना वाली कोण अशी म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

तालुक्यातील अनेक गावच्या रस्त्यांना मंजुरी असून देखील अजूनही हे रस्तेच रस्ते कामाची प्रतीक्षा करत आहे. दिंडोरी ते पालखेड, दिंडोरी ते कोराटे, कोराटे ते मोहाडी, पालखेड डॅम ते खडक सुकेने, पालखेड कॉलनी ते जोपुळ, पालखेड डॅम ते राजापूर, याशिवाय अनेक शिवार रस्तेही पावसामुळे खराब झाली असून त्यांची ही कामे करण्याची मागणी वाहन धारक शेतकरी नागरिक करत आहे.

वास्तविक पाहता हे सर्व रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याने तालुक्यामध्ये सध्या विजेच्या प्रश्न बरोबर रस्त्यांचा प्रश्न महत्त्वाचा मानला जात आहे. निवडणुकीमध्ये अनेक आश्वासने दिली जातात मात्र ते आश्वासन संबंधितांकडून पाळले जात नसल्याने तालुक्यातील जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. मुलभूत गरजेपैकी तालुक्यामध्ये रस्ता एक रस्ता हा चर्चेचा विषय सध्या सर्वत्र बनला आहे काही रस्त्यांना मंजुरी आहे तरीदेखील काम नाही अनेक वेळा तक्रारी चा पाढा वाचून देखील याकडे लक्ष देत नसल्याने काही ठिकाणी संतापही व्यक्त केला जात आहे.

काही ठिकाणी तर काम सुरू आहे मात्र हे काम कसे केले जातात हे आता नागरिकांना समजू लागले आहे. त्यामुळे होणारी कामे ही येणार्‍या काळात चागली करावी अशी मागणीही तालुक्यातील जनता करत आहे. गेल्या काही दिवसापासून वलखेड ते पाडे या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र हे काम कसे केले जातात येथील सरपंच विनायक शिंदे यांनी दाखवून दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com