
तांदळाचीबारी । वार्ताहर Peth
पेठ तालुक्यात (Peth Taluka) कोरोना (Corona) संसर्गाच्या पहिल्या व दुसर्या लाटेबरोबर तालुक्यात चिकनगुणिया (Chikungunya), डेंग्यू (Dengue) सारख्या आजाराने थैमान घातले आहे. यामुळे दिवसेंदिवस ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न दाहक बनला आहे.
त्यातच जनावरांना (Animals) ही अज्ञात आजाराने ग्रासल्याने अधिक भर पडली आहे. तालुक्यातील तांदळाचीबारी येथे जनावरांना अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
पेठ तालुक्याच्या दुर्गम भागातील तांदळाचीबारी येथे जनावरांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. यामुळे अधिच करोना संसर्गाच्या सावटाखाली जीवन जगत असलेले ग्रामस्थ पुन्हा एकदा या आजारांच्या सावटाखाली आले आहे. जनावरांना विविध आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थ भयभीत व मेटाकुटीस आले आहे.
पशुधन पर्यवेक्षक डॉ.एस. के.बहीरम यांनी जनावरांची तपासणी केली असून लम्पी आजाराची (lampi disease) लक्षणे असल्याचे सांगण्यात आले. यावेळी 50 जनावरांचे लसीकरण (Vaccination) केले. याप्रसंगी दत्तू तांदळे, जगन तांदळे, गिरीधर तांदळे, हिरामण तांदळे, नामदेव खोटरे, भगीरथ तांदळे, मधुकर माळगावे, वामन तांदळे, शांताराम राऊत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.