पैठणीच्या शेल्यावर विठ्ठलाची छबी

पैठणीच्या शेल्यावर विठ्ठलाची छबी

येवला । प्रतिनिधी Yeola

आषाढी एकादशीनिमित्त ( Aashadhi Ekadashi ) येवल्यातील पैठणी कारागीर संतोष जेजुरकर (Paithani artisan Santosh Jejurkar) यांनी पैठणीच्या शेल्यावर विठ्ठलाचा फोटो विणकाम करून काढला असून या कारागिराला याकरता एक महिन्याचा कालावधी लागला आहे.

हा शेला सचिन आहेर मित्र मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट देण्यात येणार आहे. जगप्रसिद्ध असलेली येवल्याची पैठणी ही सर्वदूर आजही प्रसिद्ध आहे .

येथील कारागीर नेहमीच आपली कला आपल्या हाताच्या साह्याने पैठणी साडीवर साकारत असतात.अशाच प्रकारे येवला तालुक्यातील पारेगाव या ग्रामीण भागातील संतोष जेजुरकर या पैठणी विणकाराने आपल्या हाताच्या साह्याने पैठणीच्या शेल्यावर विठुरायाची प्रतिमा साकारली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com