अन् शिक्षकाने घडविला आदर्श...

अन् शिक्षकाने घडविला आदर्श...

पंचाळे । वार्ताहर | Panchale

खोपडीतून देवपूरकडे जातांना मानमोडा येथील अपघाती वळणावर (Accidental turn) असलेल्या काटेरी झुडपांची (Thorn bushes) अडचण जिल्हा परिषद शाळेचे (zilha parishad school) मुख्याध्यापक सुरेश उगले (Headmaster Suresh Ugale) यांनी हातात कुर्‍हाड (axe) घेऊन दूर केली असून त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतूक होत आहे.

सदर वळणावर काटेरी बाभळीची अनेक झाडे अर्धै रस्त्यावर आले होते. त्यामुळे समोरासमोर येणारी वाहने दिसत नव्हती. त्यातून येथे अनेक वाहनांचे अपघातही (accidents) झाले आहेत. या रस्त्यावरुन दररोज ये-जा करणार्‍या

धनगरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश उगले यांच्या लक्षात ही बाब आली. शाळेचे काम झाल्यावर त्यांनी कुर्‍हाड सोबत घेऊन येत सदर वळणावर अडथळा ठरणार्‍या काटेरी झुडुपांची छाटणी करुन ही अडचण दुर केली.

त्यामुळे रस्ता पूर्णपणे मोकळा झाला असून जवळपास दोनशे मीटर अंतरावरील वाहन एकमेकास दिसत असल्याने अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. मुख्याध्यापक उगले यांच्या या कामाचे देवपूर (devpur), पंचाळे, धनगरवाडीच्या ग्रामस्थांनी कौतुक केले.

एक जागरूक नागरिक म्हणून हे काम केले असून त्यामुळे भविष्यात होणारे अपघात टाळता येतील अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com