
ईगतपुरी | प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात सकाळपासून ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रियेला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी हे मतदान पार पडत असतानाच ईगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवारांच्या सदस्यांसह त्यांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
इगतपुरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतीची निवडणूक आज होत आहे. या रणधुमाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना शनिवारी रात्री उशिरा धारगाव ग्रामपंचायतच्या दोन महिला उमेदवार सदस्यांच्या पतींमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असुन याबाबत घोटी पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील धारगाव येथील पंचवार्षिक निवडणूकीचे मतदान आज होत आहे. शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास रंजन गोवर्धने हे रस्त्यात उभे असताना अचानक एक टोळके आले आणि त्यांच्यावर अचानक हल्ला केला.