
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Municipal Corporation) कंत्राटी स्वच्छता कामगारांना कंपनीने काढल्याने उपासमारीचे संकट ओढवलेल्या 450 सफाई कामगारांनी सोमवार पासून (दि.20) राजीव गांधी भवन समोर आमरण उपोषण सूरू केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) वारंवार विविध मार्गांनी या कामगारांच्या समस्या मुख्यमंत्री, पालकमंत्री,मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन, न्यायालय अशा विविध स्तरांवर मांडले ; मात्र या कामगारांना न्याय मिळाला नसल्याने शेवटी मनसेने आमरण उपोषणाच्या हत्यार उगारले होते.
उपोषणाच्या (hunger strike) दुसर्या दिवशी आज शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांशी चर्चा केली. दरम्यान, ठेकेदाराला सूचना देऊन या कर्मचार्यांना दोन दिवसात कामावर घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर कामगारांनी उपोषण मागे घेण्यात आले.
मंगळवारी मनपा आयुक्तांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक (Ashok Murtadak), कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष परशुराम साळवे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, कामगार सेना चिटणीस तुषार जगताप, शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे यांच्या शिष्टमंडळास ह्या कामगारांना दोनच दिवसात ठेकेदाराच्या माध्यमातून परत कामावर घेण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर सहाय्यक आयुक्त नितीन नेर यांनी शहराध्यक्ष दिलीप दातीर, तसेच ‘वॉटरग्रेस प्रोडक्ट्स’ (Watergrace Products) कामगारांना लिंबू शरबत देऊन उपोषणाची सांगता केली.