नाशिकमध्ये धोकादायक घर कोसळले

नाशिकमध्ये धोकादायक घर कोसळले

जुने नाशिक |प्रतिनिधी | Old Nashik

येथील बागवानपुरा चौकातील धोकादायक घर कोसळण्याची घटना रविवारी रात्री घडली. घटनेत एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही...

गेल्या तीन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. रविवार सायंकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे बागवानपुरा भागातील धोकादायक जुने घर कोसळले.

या घरात जाफर शेख सलुन दुकान चालवित होते. लॉकडाऊनमुळे दुकान बंद होते. पाऊस सुरू असल्याने रस्त्यावर कोणी नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. अत्तर शेख यांच्या एम. एच. १५ ई. एच. ०३७० रिक्षावर घराचा काही भाग कोसळल्याने नुकसान झाले. घर कोसळण्याचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

महापालिका पूर्व विभागीय कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. घरमालकांना काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावण्यात आल्याची माहितीदेखील विभागीय अधिकारी स्वप्निल मुधळवाडकर यांनी दिली.

यंदाच्या पावसाळ्यात धोकादायक घर कोसळण्याची ही पहिलीच घटना आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशाप्रकारे धोकादायक घरे, वाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात. मुसळधार पावसामुळे अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महापालिकेकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com