धुणी भांडी करणार्‍या महिलेचा प्रामणिकपणा

कपड्यात सापडलेले 50 हजार परत
धुणी भांडी करणार्‍या महिलेचा प्रामणिकपणा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

एका सामान्य कुटूंबातील धुणे भांडे करणार्‍या महिलेने घरमालकाच्या धुण्याच्या कपड्यांंमध्ये washing clothes आढळून 50 हजार रुपये परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन honesty दिंडोरीतील विजयनगरमध्ये घडले. तालुक्यात त्या महिलेचे कौतुक होत आहे.दिंडोरी येथील विजयनगर Dindori- Vijay Nagar मध्ये राहत असलेल्या लताबाई गणपत पाटील Latabai Ganpat Patil ह्या गेल्या अनेक दिवसापासून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी धुणी भांडी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत आहे. त्या विजयनगर येथील शरद जोपळे Sharad Jople यांच्या घरी सध्या धुनी भांडीचे काम करीत आहे.

शरद जोपळे हे नेहमीप्रमाणे आपल्या व्यवसायानिमित्ताने बाहेर जात असताना त्यांना एका इसमाचे 40 हजार रुपये द्यायचे होते आणि दुपारी पैसे द्यायचे म्हणून ते आपल्या शर्ट व पॅन्टचे खीसे तपासत असताना त्यांना 50 हजार रुपये गेले कुठे याची शोधाशोध करीत होते. त्यानंंतर त्यांनी आपल्या पत्नी सुनिता जोपळे यांच्याकडे घरी चौकशी केली असता त्यांनीही घरामध्ये शोधाशोध केली मात्र घरात पैसे आढळून आले नाही. 3

दुपारी बारा वाजता लताबाई गणपत पाटील या धुणी-भांडी करण्यासाठी गेले असता त्या नेहमीप्रमाणे धुणे धूत असताना जोपळे यांचा पॅन्टच्या खिशामध्ये त्यांना 50000 रुपये आढळून आले कुठलाही विचार न करता लताबाई पाटील यांनी जोपळे यांच्या पत्नी सुनिता जोपळे यांना सांगितले की त्यांच्या खिशामध्ये मला पैसे सापडले आहे यावेळी सुनिता जोपळे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता त्यानंतर लताबाई पाटील यांनी त्यांना लगेच पैसे परत केले.

शरद जोपळे यांनाही ही बातमी कळतात त्यांनी लताबाई पाटील यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करून त्यांना आपल्या घरी बोलावून आपल्या पत्नी सुनिता जोपळे यांच्या हस्ते साडीचोळी पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचे कौतुक करून आजही समाजामध्ये प्रामाणिक माणसे आहे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे लताबाई पाटील ह्या आहे. असे शरद जोपळे यांनी सांगितले.

यावेळी दिंडोरी नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन गांगुर्डे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष बापू चव्हाण, तालुकाध्यक्ष संदिप गुंजाळ, प्रसिध्दीप्रमुख मनोज पाटील, रघुनाथ पिंगळे, सुशीला गायकवाड, पिंगळे आदी उपस्थित होते.

कपडे धुत असताना मला कपड्यामध्ये पैसे आढळून आले.घरात कुणीही नसल्याने मी ते पैसे घेऊन शरद जोपळे यांच्या पत्नीला फोन करुन बोलावून घेऊन ते पैसे त्यांच्या ताब्यात दिले. ते माझे कर्तव्यच होते परंतू शरद जोपळे व त्यांच्या पत्नीला माझ्या प्रामाणिकपणावर अभिमान होवून जो माझा सन्मान केला तो माझ्या आयुष्यात कायम आठवणीत राहिल.

लताबाई पाटील, सन्मानार्थी महिला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com