रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; 90 हजारांची रोकड परत

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; 90 हजारांची रोकड परत

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashik Road

वृध्द महिलेची 90 हजार रोकड (90 thousand cash) असलेली पेन्शनची (Pension) गहाळ झालेली बॅग (Missing bag) उपनगर पोलिसांनी रिक्षा चालकाच्या (Rickshaw puller) मदतीने एका तासात सदर महिलेच्या स्वाधीन केली. बिटको पोलिस चौकीत (Bitco police station) शांताबाई पुंडलिक टोपले (रा. केळझर, सटाणा) यांनी तक्रार नोंदवली होती.

पेन्शनची नव्वद हजाराची रक्कम घेण्यासाठी टोपले या मुली व जावयासह दत्तमंदिर चौकाजवळील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत (Bank of India branches) गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास पेन्शनचे पैसे (Pension money) काढल्यानंतर त्या जावई व मुलीसह परिसरात खरेदी करण्यासाठी गेल्या. खरेदीनंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावी जाण्यासाठी रिक्षात (Auto Rickshaw) बसताना पैशाची बॅग नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जवळील बिटको पोलिस चौकीत धाव घेतली.

सहाय्यक निरीक्षक भामरे (Assistant Inspector Bhamre) यांनी ही घटना वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर (Senior Inspector Nilesh Mainkar) यांना सांगितली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला (Crime Investigation Squad) सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक भालेराव, सहाय्यक निरीक्षक राकेश भामरे, उपनिरीक्षक विकास लोंढे, महिला उपनिरीक्षक तेजल पवार, पोलिस ठाकूर, कर्पे, शिंदे, गवळी यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तक्रारदाराने खरेदी केलेल्या दुकानांचे सीसीटिव्ही फुटेज (CCTV footage) तपासले. बेंगलोर अय्यंगार बेकरीसमोर टोपले यांची पैशाची बॅग राहिल्याचे दिसले.

ही बॅग रिक्षाचालक सूर्यकांत नालकर (Rickshaw driver Suryakant Nalkar) यांनी प्रामाणिकपणे उचलून बेकरीच्या ड्रावरमध्ये ठेवल्याचे दिसले. पोलिसांनी बॅग ताब्यात घेऊन तपासली असता नव्वद हजाराची रोकड व कागदपत्रे जशीच्या तशी असल्याचे आढळले. या प्रामाणिकपणाबद्दल (Honesty) रिक्षाचालकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. टोपले कुटुंबियांनी रिक्षाचालक व पोलिसांचे आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com