रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

रिक्षात Auto Rikshaw विसरलेले दोन लाखांचे दागिने असलेली बॅग ( Jewelry bag )रिक्षाचालकाने प्रवाशाला प्रामाणिकपणे परत केली. श्रीरामपूर येथील संदीप पगारे कुटुंबासह चेहेडी पंपिंग येथे सासूरवाडीला आले. चेहेडी नाका ते चेहेडी पंपिंग असा प्रवास त्यांनी रिक्षाने केला.

रिक्षातून उतरल्यावर ते दोन लाखांची सोने-चांदीच्या दागिन्यांची बॅग रिक्षात विसरले. रिक्षाचालकाचा नंबर, चालकाचे नाव माहीत नव्हते. तरीही त्यांनी चेहेडी परिसरात रिक्षाचालकाचा शोध घेतला.

रिक्षाचालक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यावर त्याला रिक्षात बॅग दिसली. इतर रिक्षाचालकांना त्यांनी ही माहिती दिली. तसेच सदर प्रवासी आल्यास ही बॅग नाशिकरोड पोलीस ठाण्यात जमा केली आहे असे कळवा, असे या चालकाने इतर रिक्षाचालकांना सांगितले.

संदीप पगार तेथे आले. इतर रिक्षाचालकांनी तुमची बॅग रिक्षाचालक (एमएच 15 ई एच 1231) शंकर बेदाडे (शिंदेगाव) Auto Rikshaw Driver Shankar Bedade यांनी पोलीस ठाण्यात जमा केल्याचे सांगितले.

बॅगमालक नाशिकरोड पोलीस ठाण्यात गेले. पोलिसांसमक्ष शंकर बेदाडे यांनी दोन लाखांचे दागिने असलेली बॅग संदीप पगारे यांना परत केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गणेश न्याहादे, राजू पाचोरकर यांनी बेदाडे यांचा सत्कार केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com