रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

सापडलेली सोन्याची अंगठी सुखरूप परत
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

रेस्टकॅम्प रोडवरील देवी मंदिराजवळ रिक्षाचालक दिलीप बर्वे ( Auto Rikshaw Driver Dilip Barve )यांना सोन्याची अंगठी ( Gold Ring) सापडली. सदर अंगठी त्यांनी प्रामाणिकपणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्या स्वाधीन करत माणुसकीसह प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.

रिक्षाचालकांविषयी जनमानसांत कमालीचा गैरसमज असताना या प्रकारामुळे अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचे दिसून येते. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काल पावसाचा जोर ओसरल्याने वीकेण्डमुळे देवळालीत गर्दी उसळली होती.

अशावेळी देवी मंदिराजवळ बर्वे यांना सोन्याची अंगठी सापडली असता त्यांनी थेट पोलीस स्टेशनकडे रिक्षा वळवली व पोलीस अधिकार्‍यांकडे सापडलेली अंगठी देताना सांगितले की, ज्यांची कोणाची अंगठी देवी मंदिर परिसरात हरवली असेल त्यांना परत करा.

सदर अंगठी दिलीप तुपे नामक व्यक्तीची असल्याची खात्री पाटल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांच्यासमक्ष दिलीप बर्वे यांनी तुपे यांना दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष अजय वाहणे व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. बर्वे यांच्या प्रामाणिकपणाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com