
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
वरुणा नदी संवर्धन समिती (Varuna River Conservation Committee), नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्था यांचे वतीन वरुणा नदी नामफलक उद्घाटन सोहळा
लक्ष्मण रेखा, चरण पादुका रोड, चार हत्तीपुल, पंचवटी, नाशिक (nashik) येथे मा.मंहत भक्तीचरणदास महाराज, लक्ष्मण रेखा मंदिराचे महंत तिवारी, नामनपाचे माजी विभागीय अधिकारी कैलास रबाडिया, आरोग्य अधिकारी संजय दराडे, गोदावरी गटारीकरण मंचचे निशिकांत पगारे, कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे, दिगंबर धुमाळ, किशोर बेलसरे, संस्थेचे मार्गदर्शक अनिल कानडे, सुदेश जाधव या मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.
महंत भक्तीचरणदास महाराज (Mahant Bhakti Charandas Maharaj) यांनी वरुणानदीचे ऐतिहासिक महत्व उपस्थितानां सांगितले. तर उप नद्या प्रवाहित व जिवंत राहिल्या तर गोदावरी (godavari) सारखी नदी हि बारमाही कायम प्रवाहित कशी राहील यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी नवनाथपंथी सामाजिक बहुउद्देशिय संस्थेचे गोविंद इंगळे, सचिन लेवे, चेतन कानडे, अरुण इंगळे, संध्याताई पवार, चेतन शिंदे, सागर गरड यांनी प्रयत्न केले. वरुणा नदी संवर्धन समितीचे रोहित कानडे यांनी प्रास्ताविक तर आभार प्रदर्शन प्रकाश बर्वे यांनी केले.